अखेर मुर्तिजापूरच्या वादग्रस्त बिडीओ गजानन अगर्ते यांची बदली…

मूर्तिजापूर : अनेक प्रकरणात वादग्रस्त ठरलेले मूर्तिजापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी गजानन अगर्ते यांची बदली याची १६ जून रोजी बदली करण्यात आली आहे.

मूर्तिजापूर पंचायत समितीचे बिडीओ गजानन अगर्ते हे यापूर्वी अनेक प्रकरणात वादग्रस्त ठरले आहे तोच ठपका ठेवून गतवर्षीच त्यांची बदली झाली होती. तेव्हापासून काही जनप्रतिनिधींनीच्या आशिर्वादाने इथेच कार्यरत होते.

अलीकडेच एक प्रकरण त्यांच्या अंगलट आल्याने त्यांना तडकाफडकी कार्यमुक्त करण्यात आले आहे. त्याचा पदभार नवीन गटविकास अधिकारी ओ. टी. गाठेकर यांनी स्विकारला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here