लातूर – नांदेड रस्त्यावरील खड्डे तातडीने बूजवून महामार्गाच्या कामाला सुरूवात करण्याची केंद्रीय रस्तेवहातूक मंत्री नितीन गडकरी यांच्या कडे मागणी…

अहमदपूर – बालाजी तोरणे

लातूर – नांदेड (एनएच 361) या रस्त्यावरील खड्डे युध्दपातळीवर बुजवून या राष्ट्रीय महामार्गाचे काम तातडीने सुरूवात करावी अशी आग्रही मागणी सम्राट मित्रमंडळाच्या वतीने यूवकनेते डाॅ. सिध्दार्थकूमार सूर्यवंशी यांनी केंद्रीय रस्ते वहातूक मंत्री ना. नितीनजी गडकरी यांची नागपूर येथे प्रत्यक्ष भेट घेवून एका निवेदनाद्वारे केली आहे.

केंद्रीय मंत्री ना.नितीन गडकरी यांना दिलेल्या निवेदनात पूढे म्हटले आहे की,लातूर-नांदेड या राष्ट्रीय महामार्गासाठी लागनारे आवश्यक भूसंपादन झाले आहे.मात्र हा रस्ता NHAI(भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण) यांच्या कडे हस्तांतरीत झाल्यानंतर संबंधित कंत्राटदाराने काम सूरू केले नाही.

सदरील रस्त्याच्या देखभाल दूरूस्ती अभावी या रस्त्यावर मोठ मोठी खड्डे पडले आहेत.यामूळे जनतेला आणी वाहनधारकांना गेल्या दोन वर्षा पासून मोठी कसरत करत प्रवास करावा लागत आहे.या खड्ड्यामूळे दोन्ही जिल्ह्यातील नागरीकांची प्रचंड गैरसोय होत आहेत.दैनंदिन अपघात होत आहेत जीवीत व वित्त हानी होत आहे.

या प्रकरणी वेळोवेळी अनेक पक्ष संघटनांनी अर्ज निवेदने देवून या भागात अंदोलने सूध्दा झाली आहेत.मात्र प्रत्यक्षात काम सूरू झाले नाही ही वस्तूस्थिती आहे.आजघडीला लातूर व नांदेड ला जाण्यासाठी तीन ते चार तास लागत आहेत.

ही वस्तू स्थिती लक्षात घेवून आपण वैयक्तीक लक्ष घालून तातडीने नांदेड-लातूर मार्गावरील तूर्त खड्डे भरून रस्ता सुस्थितीत करून घ्यावा तसेच NHAI(भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण) च्या नियमावली नूसार रस्ता रुंदीकरण करून प्रत्यक्षात हायवेच्या कामाला तातडीने सुरूवात करण्याचे आदेश द्यावेत असेही पूढे म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here