धर्म विरोधी भाजप खासदार पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या वर्ती गुन्हा दाखल करा – शिवसेना बोदवड…

तहसीलदार बोदवड यांना निवेदनाद्वारे इशारा देण्यात आला कि,कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देश व राज्यभरातील सर्व धार्मिक स्थळे केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार बंद आहेत.हे माहीत असून सुद्धा कोरोना काळात नागरिकाना जनजागृतीपर कार्य न करता भारतीय जनता पक्षाचे दांभिक पदाधिकारी हे देवा धर्माचा आधार घेवून कुटील राजकारण खेळण्याचा प्रयत्न करीत आहे.

त्याचाच एक भाग म्हणून काल दि. २९ ऑगष्ट रोजी भाजपच्या खासदार श्रीमती रक्षा खडसे,राष्ट्रीय बेटी बचाव बेटी पढाव समितीचे डॉ.राजेंद्र फडके,अशोक कांडेलकर व इतर पदाधिकारी कार्यकर्ते यांनी लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान आसलेल्या आदिशक्ती श्री.संत मुक्ताई साहेब यांच्या पवित्र मंदिराच्या गाभाऱ्याजवळ घंटानाद व शंखनाद आंदोलन केले.हे आंदोलन करीत असताना त्यांनी गाभाऱ्याजवळ चक्क चपला घातलेल्या दिसून येत आहे.

यामुळे महाराष्ट्रातील तमाम वारकरी व हिंदू धर्मियात प्रचंड संतापाची लाट निर्माण झालेली. राजकीय स्टंटबाजीसाठी हिंदूधर्मियांच्या भावनांशी खेळणाऱ्या या भाजप पदाधिकाऱ्यांवर तमाम वारकरी व हिंदूंच्या भावना दुखावल्या प्रकरणी कायदेशीर कारवाई करण्यात यावी अन्यथा शिवसेनेतर्फे शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल..

सुनील पाटील विधान सभा क्षेत्र प्रमुख,,गजानन खोडके ता.प्रमुख,कलीम शेख अ.जि.उपप्रमुख शांताराम कोळी ता.संघटक,,संजू महाजन,हर्षल बडगुजर शहेर प्रमुख,,अय्युब कुरेशी,दीपक माली,कैलास सुरेवंशी,,समीर शेख, धनराज भाऊ,

विलास माली, नाईम खान,गोपाळ पाटील,,अतिष सरवान,,संजू महाजन,,असिफ बागवान,,अमोल वैवारे,,चिकलकर,सज्जू टेलर,,भास्कर गुरचड,,जितू सर,,गजानन भोंडेकर,,बंटी पाटील,गणेश पाटील,,योगेश पाटील,,प्रमोद माली,,सुनील सूर्यवंशी,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here