नांदेड जिल्ह्यातील देगलुर वन परिक्षेत्र (प्रा) कार्यालय समोर वन कामगारांचे किमान वेतना प्रमाणे विशेष भत्ता वाढवुन द्यावे ,थकित वेतन देणे आदी मागनी साठी दिनांक 25 जानेवारी पासुन बेमुदत चक्री धरणे आंदोलन चालु असताना आधिकारी मात्र या आंदोलना कडे दुर्लक्ष करित असल्याचे दिसत आहे. आणि वन कामगारांना शासन ठरुन दिलेले वेतन न देता उचल स्वरूपाचे वेतन देत आहे.
हे वेतन बारमाही वन कामगारांना देने अन्यायकारक बाब आहे कारण हे वन कामगार 25 ते 30 वर्षा पासुन बारमाही कामगार रोपे तयार करणे , रोप लागवड करने, रोपवनाचे, संरक्षण करने, जाळ रेषा करने, रोपांना मातीचा भर देणे, रोपांना पाणी देणे आदी कामे कार्यालय अंतर्गत आधिकारी वन कामगारा कडुन करून घेवून कमी वेतन देणे अन्याय कारक बाब आहे तरी सध्या थंडीची लाट असुन करोना महामारी चालु असताना वरिष्ठ अधिकारी या कडे लक्ष्य देवुन हे प्रश्न निकाली काढावे हा प्रश्न न मिठल्यास आंदोलन तिवृ करण्यात येईल असे वन कामगारांचें म्हणणे आहे.