पंधरा वर्षानंतर भातसा नगरच्या आठवडी बाजाराला नव्याने सुरुवात, तालुक्याचे माजी आमदार श्री. पांडुरंग बरोरा यांच्या हस्ते उदघाटन…

शहापूर – प्रफुल्ल शेवाळे

ठाणे जिल्हा शहापूर तालुक्यातील मुंबईला पाणीपुरवठा करणारे भातसा धरण आणि या ठिकाणी बसलेला भातसा नगर एक छोटेसे गाव. भातसा प्रकल्प निमित्ताने अनेक कर्मचारी आणि इतर नागरिकांचं राहण्यासाठीचे ठिकाण म्हणून आज भातसा नगर नावारूपाला आला आहे. या भातसा नगर परिसरात तब्बल पंचवीस वर्षे आठवडी बाजार हा चालू होता. त्यानंतर जसजशी लोकसंख्या कमी होऊ लागली तसतसा बाजार कमी होऊ लागला आणि 2006 नंतर पूर्णपणे बंद झाला.

आणि आज तब्बल पंधरा वर्षानंतर भातसा नगराचा आठवडी बाजार पुन्हा एकदा नव्याने पाहायला मिळाला. या परिसरातील आजूबाजूचे खेडे पाडे ची वस्ती, लगतची गावे आणि इतर पंचक्रोशीतील नागरिकांच्या मागणी नंतर भातसानगर चा आठवडी बाजार नव्याने सुरु होताना दिसत आहे.

आज दिनांक 17 ऑक्टोंबर रोजी शहापूर तालुक्याचे माजी आमदार पांडुरंग बरोरा यांच्या हस्ते सदर आठवडी बाजाराचे उद्घाटन करण्यात आले . या बाजारपेठेत धनधान्य, भाजीपाला, फळे इतर खाद्यपदार्थाच्या वस्तू, महिलांसाठीचे कटलरी अशी विविध प्रकारची दुकाने पाहायला मिळत आहेत. सदर आठवडी बाजाराचा लाभ संपूर्ण पंचक्रोशीतील नागरिकांनी घ्यावा असे आवाहन माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी केल आहे.

उद्घाटन प्रसंगी सामाजिक नेत्या अपर्णा ताई खाडे, राम कृष्ण भेरे, ग्रामपंचायत सदस्य बशीर शेख, राजूभाई टाक, कृषी सभापती संजय निमसे, नजीर शेख,पप्पू भोईर हंबीर रावसाहेब, दत्ता भोईर, कविता भोईर आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here