कोगनोळीत पंधरा वर्षीय शालेय विद्यार्थिनीची गळफास लावून आत्महत्या…

राहुल मेस्त्री ..
कोगनोळी तालुका निपाणी येथील काशिद गल्ली म्हणून परिचित असलेल्या भागात एका 15 वर्षीय शालेय विद्यार्थिनीने दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या करून आपला जीव संपवल्याची घटना दिनांक 19 रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या दरम्यान घडली आहे.याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की स्वाती

बाळासाहेब काशीद वय वर्ष 15 असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव असून ती इयत्ता नववी मध्ये शिक्षण घेत होती. आज सकाळी आई व भाऊ कामानिमित्त बाहेर गेले असता आणि वडील औषधासाठी मेडिकल स्टोअर मध्ये गेले असता घरामध्ये कोणी नसलेले पाहून मृत स्वातीने गळफास लावून आत्महत्या केल्याचे समजते.

ही माहिती कोगनोळी गावामध्ये वाऱ्यासारखी पसरल्याने येथील नागरिकांनी बघण्यासाठी मोठी गर्दी केली होती. सदर घटना पोलिसांना समजताच कोगनोळी आऊट पोस्टचे पोलीस अधिकारी एएसआय एस एम सूर्यवंशी, बीट हवलदार राजू खानाप्पानावर यांनी भेट देऊन पंचनामा केल्यानंतर मृतदेह खाली उतरला सदर मृतदेहाचे शवविच्छेदन

करण्यासाठी निपाणीतील शासकीय गांधी इस्पितळात पाठविण्यात आले.या पंधरा वर्षीय शालेय विद्यार्थिनीने अशी अचानक गळपास लावून आत्महत्या का केली याचे कारण स्पष्ट झालेले नसुन सदर घटना घडताच तालुका पंचायत सदस्य प्रीतम पाटील कोगनोळी मराठा मंडळ उपाध्यक्ष उमेश पाटील, प्रवीण पाटील,योगेश चौगुले आदी घटनास्थळी दाखल झाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here