पातुर पर्यटन केंद्राला भीषण आग, ३५ वन कर्मचारी अधिकारी दोन तास आगीशी झुंज…

पातूरची अग्निशमन यंत्रणा कुचकामी

पातूर 30 मार्च,. वेळ दुपारी 01:59… क्रिकेट मुळे पातुर पर्यटन केंद्राला आग. राऊंड ऑफिसर प्रणाली धर्माळे यांच्या नेतृत्वात एकाच वेळी 35 वनमजूर वनरक्षक वनाधिकारी 10 ब्लोअर सह घटनास्थळी अवघ्या सात मिनिटात दाखल… त्यानंतर सलग एकशे वीस मिनिटं आगीशी झुंज… अन् दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात… यानंतर अनेक कर्मचाऱ्यांच्या तब्येत बिघाड… सलग 14 तास नंतर संपूर्णपणे आग विझवण्यात यश आले.

डिस्कवरी चैनल वर असा थरारक प्रसंग पातूरच्या पर्यटन केंद्रामध्ये घडत होता. तेवढ्याच ताकदीने कर्मचारी-अधिकारी लढत होते.. त्याच वेळी विझवताना आगीच्या गराड्यात अडकलेल्या राऊंड ऑफिसर प्रणाली धर्माळे त्यांच्या अंगातील ड्रेस जळायला सुरुवात झाली.

वनविभागाचे आग विझवणारे 10 ब्लोअर मशीन सतत आग विझवत होत होते. मात्र या ठिकाणी हजर असलेली अग्निशामक दलाची गाडी अपुरा पाईप आणि कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे आग विझवण्यासाठी इच्छा असूनही सहकार्य करू शकत नव्हते.

35 जणांच्या प्रामुख्याने वनमजूर वनरक्षक स्वतः राऊंड ऑफिसर प्रणाली धर्माळे रेंज ऑफिसर धीरज मदने वनरक्षक अविनाश,घुगे पीजी काशीदे अतुल करोडपती अनिल वानखडे विठ्ठल बेलाड यांच्या प्रयत्नाने पातुर पर्यटन केंद्र पूर्णपणे वाचवण्यात यश आलं.

पर्यटन केंद्रात प्रवेश करताना डाव्या बाजूने खूप हवा असल्यामुळे वावटळ उठली या वादळ मध्ये पळसाच्या झाडाची हिरवी फांदी वीज वाहून नेणाऱ्या तारांमध्ये घुसली तेथेच शॉर्टसर्किट झालं शॉर्ट सर्किटमुळे पर्यटन केंद्रांमध्ये आग लागली.

तातडीने आग विझवण्यासाठी क्षणाचा विलंब न करता प्रणाली धर्माळे दाखल झाल्या त्यांनी आगीचा आढावा घेऊन उपाययोजना सुरू केल्या जाणारे दहा ब्लोअर सुमारे दोन तास सतत धडधडत होते. सर्व कर्मचारी जीवाची बाजी लावून काम करीत होते त्यामुळे पातूर पर्यटन केंद्र बेचिराख होण्यापासून वाचले.

पातूर येथील अग्निशमन दलाकडे फायर ऑफिसर फायरमॅन कर्मचारीच वर्ग अस्तित्वात नाही आग लागली कि काय करावे असा प्रश्न पातुर नगर परिषद प्रशासनाला पडतो त्यामुळे शासनाने तातडीने अग्निशमन दलाच्या जागा भराव्यात अन्यथा आगीच्या भक्ष्यस्थानी भविष्यात मानव अथवा संपत्ती त्याचे नुकसान टाळणे शक्य होणार नाही

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here