कुख्यात गुंडाने एन्काउंटरच्या भीतीने चक्क अश्या अनोख्या पद्धतीने पोलिसांना आला शरण…

न्यूज डेस्क – कुख्यात गुंडावर होत असेलल्या एन्काउंटरच्या भीतीने उत्तर प्रदेशमधील संबळ पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या संबळ परिसरात असणारा एक गँगस्टर अगदी आगळ्यावेगळ्या पद्धतीने पोलिसांना शरण आला आहे. 

पोलिसांकडून करण्यात येणाऱ्या एन्काउंटरसारख्या बेधडक कारवाईची भितीमुळे या कुख्यात गुंडाने गळ्यात पाटी घालून स्वत:ला पोलिसांच्या ताब्यात दिलं. हा सर्व प्रकार नरवासा पोलीस स्थानकामध्ये घडला आहे. विशेष म्हणजे या आरोपीवर पोलिसांनी १५ हजार रुपयांचे बक्षीसही ठेवलं होतं.

अमरोहामध्ये राहणारा नईम नावाचा हा गुंड पोलीस स्थानकामध्ये पोहचला आणि थेट पोलिसांच्या पायाच पडू लागला. तो रस्त्यावरुन चालत पोलीस स्थानकात आला तेव्हा त्याने गळ्यामध्ये पाटीही घातली होती. यावर त्याने ‘मला गोळी मारु नका,’ असा मजकूर लिहिला होता.

पोलीस स्थानकामध्ये पोहचल्यानंतरही नईम बराच वेळ पोलिसांच्या हातापाया पडत होता. पोलीस त्याला उठून उभं करण्याचा प्रयत्न करत होते मात्र तो रडतच मला माफ करा, माझा जीव घेऊ नका असं म्हणत होता. आपण कोणताही गुन्हा केलेला नाही असंही नईमने प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.

मला संबळ पोलिसांची भरपूर भीती वाटत आहे. ते मला कोणत्याही प्रकरणामध्ये अडकवू शकतील म्हणून मी पोलिसांना शरण आलो आहे, असंही नईम म्हणाले.संबळ पोलिसांनी याची माहिती आपल्या tweeter च्या माध्यमातून दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here