नेर्ली सरपंचांच्या शिष्टाईनंतर उपोषण स्थगित…

कोल्हापूर प्रतिनिधी-राजेद्र ढाले
नेर्ली (ता. करवीर) येथील नेर्ली ते गोकुळ शिरगाव मुख्य रस्त्यावर मारुती आकाराम पाटील यांच्या घराजवळ शेजाऱ्यांनी अतिक्रमण करीत वाहत्या गटारी वर मुरमाचा भराव टाकला होता. त्यामुळे गोकुळ शिरगाव एमआयडीसीकडून येणाऱ्या गटारीचे पाणी मारुती पाटील यांच्या घरासमोर तुंबल्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला होता.

याबाबत ग्रामपंचायतीशी वारंवार पाठपुरावा करूनही दखल घेतली जात नसल्याने आज (ता. 13) रोजी नेर्ली ग्रामपंचायत कार्यालयासमोर पाटील दाम्पत्य उपोषणासाठी बसले होते. दरम्यान सदर उपोषणाची दखल गोकुळचे संचालक व सरपंच प्रकाश पाटील यांनी घेत अर्जदार, गैरअर्जदार व सर्व पदाधिकारी यांच्या संयुक्त बैठकीत या प्रश्नावर तोडगा काढण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर अर्जदार पाटील दाम्पत्याने उपोषण स्थगित केले.

यावेळी ग्राम विकास अधिकारी एस एस हासुरे उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य हजर होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here