आलेगांव परिसरातील शेत रस्त्याच्या दुरावस्थेमुळे शेतकरी हैरान!…

पातूर तालुका प्रतिनिधी :आलेगांव ग्रामपंचायत प्रशासनाच्या दप्तरी नोंद असलेल्या आलेगांव परिसरातील १७ शेत रस्त्याच्या दुरावस्थेमुळे शेतकऱ्यांना शेतातील शेतमाल गावात आणता येत नसल्यामुळे शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत असल्याने शेतकरी हैराण झाले असून आर्थिक हाणीला सामोरे जावे लागत आहे.या गंभीर बाबीकडे शासनाने लक्ष देण्याची गरज आहे.

अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील सर्वात मोठे असलेल्या आलेगांव ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेले १७ शेत रस्ते आहेत.सदर शेत रस्त्याच्या दुरावस्थ्येमुळे, शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेला कांदा गावामध्ये आणता येत नसल्यामुळे मोठे नुकसान सहन करावे लागत आहे.तसेच भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना भाजीपाला गावात आणणे दुरापास्त झाले आहे.या मुळे सदर परिसरातील शेतकरी रस्त्याच्या दुरावस्थेमुळे हैराण झाले आहेत.या गंभीर बाबीकडे शासनाने लक्ष केंद्रित करून शासन स्तरावर शेत रस्त्याची दुरुस्ती करून द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गा कडून होत आहे.

अनेक शेतरस्त्याची अर्धवट कामे तसेच पडून असून गेल्या दोन वर्षा पासून
गोळेगाव, डोलारखेड शेतरस्त्याची कामे ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत सुरू करून खोदकाम करून ठेवले झालेल्या खोदकामावर गिट्टी मुरूम टाकण्यापूर्वीच सदर काम अर्धवट सोडून दिले.त्यामुळे सदर रस्ते पावसाळ्यामध्ये शेतकऱ्यांना त्रासदायक बनले असून शेतातील खरीप पेरणी करतांना शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

चिखलमय व अरुंद शेत रस्त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये वाद!
शेत रस्ते नादुरुस्तीने व शेतकऱ्यांना पेरणी करिता पेरणीची वाहने नेताना अडचणी होत असल्याने अनेक वेळा शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या शेतातून पेरणीची वाहने न्यावी लागतात,त्यामुळे वाहन शेतातून का नेले म्हणून बरेचवेळा शेतकऱ्यांमध्ये वाद विवाद होऊन पोलीस स्टेशन पर्यंत पोहोचतात ह्या सर्व बाबी शेतकऱ्यांना परवडणाऱ्या नसून शासनाने गंभीरपणे विचार करून शासन स्तरावर शेत रस्त्यांची दुरुस्ती करावी जेणे करून शेतकऱ्यांच्या सोईचे होईल.

रस्त्या अभावी शेतकऱ्यांचा शेतमाल शेतातच पडून!

राज्य शासनाने अनुदान तत्वावर शेतकऱ्यांना कांदा चाळी कांदा साठवून ठेवण्यासाठी दिल्या शेकडो शेतकऱ्यांनी कांदा चाळी सुद्धा घेतल्या सद्या शेतकऱ्यांनी कांदा साठवून ठेवलेला आहे.कांद्याची विक्री करायची परंतु पावसामुळे शेतरस्ते चिखलमय झाले असून वाहने फसत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना कांदा गावामध्ये कसा आणावा हा प्रश्न निर्माण झाला असून अनेक शेतकऱ्यांचा कांदा,कांदा चाळी मध्ये सडत आहे.तसेच रस्त्या अभावी भाजीपाला उत्पादक शेतकरी सुद्धा खराब रस्त्यांमुळे हैराण झाले आहेत.सदर बाबीचा राज्य सरकारने वेळीच विचार करून शेतरस्त्याची दुरुस्ती शासन स्तरावर करू द्यावी अशी शेतकऱ्यां कडून मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here