सुमठाना येथील शेतकऱ्यांचा कालव्याच्या (कॅनॉल) मावेजासाठी आमरण उपोषणाचा इशारा…

बालाजी तोरणे अहमदपूर व चाकूर तालुका प्रतिनिधी

अहमदपूर तालुक्यातील सुमठाना येथील शेतकऱ्यांची गेल्या बारा वर्षापुर्वी उर्ध्व मनार उपसा सिंचन प्रकल्पा अंतर्गत कालव्यासाठी(कॅनॉल) शेतकऱ्यांच्या जमीनीचे भुसंपादन केले गेले असुन त्या जमीनीचा मोबदला(मावेजा)अद्यापही मिळाला नाही तो देण्यात यावा यासाठी संबंधीत शेतकऱ्यांनी दि ८ सप्टेंबर रोजी उप-विभागीय कार्यालयासमोर अमरण उपोषण करण्याचा इशारा दि ३१ ऑगस्ट रोजी देण्यात आलेल्या एका निवेदनाद्वारे दिला आहे

याविषयी सविस्तर माहिती अशी की,उर्ध्व मनार उपसा सिंचन प्रकल्पा योजना अंतर्गत डावा/उजव्या (कॅनॉलमध्ये) सुमठाना येथील शेतकऱ्यांच्या जमिनीचे भुसंपादन करून इ.स २००७-२००८ मध्ये खोदकाम केले गेले आहे परंतु आज तागायत पर्यंत आम्हाला कोणत्याही प्रकारचा मोबदला (मावेजा) मिळाला नाही

तरी संबंधीत शेतकऱ्यांना मावेजा मिळवुन दयावा व शेतकऱ्यांची फसवणुक करणाऱ्या अधिकाऱ्यांना नोटीस का दिली नाही जमीन ताबा प्रमाणपत्र का दिले गेले नाही याचा जाब विचारावा आणि संबंधीतावर योग्यती कार्यवाही करावी अन्यथा आपल्या कार्यालयासमोर संबंधीत शेतकऱ्यांच्या वतीने दि ८ सप्टेंबर रोजी अमरण उपोषण करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे निवेदन दि ३१ ऑगस्ट रोजी उपजिल्हाधिकारी अहमदपूर यांना देण्यात आले आहे

सदरील निवेदनावर गणेश पोले, बालासाहेब मुसळे,विलास मुसळे,मदन मुसळे, विश्वनाथ पोले,मल्हारी पोले, व्यंकटी पोले,गुणवंत मुसळे, संग्राम मुसळे, गणपती पोले,शशिकांत कुलकर्णी आदी शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत,सदरील निवेदनाच्या माहीतीस्तव प्रति जिल्हाधिकारी लातुर, तहसीलदार अहमदपूर, पोलीस निरिक्षक अहमदपूर, व्हटी मध्यम प्रकल्प उपविभाग कार्यालय अहमदपूर यांना देण्यात आलेल्या आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here