विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी कोगनोळीतील शेतकऱ्यांचा; हेसकॉम कार्यालयाला घेराव…

राहुल मेस्त्री

एकिकडे मार्च महिन्यात उकाडा वाढला असुन त्याचबरोबर उन्हाळ्याच्या दिवसात शेतीसाठी पाणी पुरवठा कमी पडत असल्याने विद्युत पुरवठा सुरळीत नसल्यामुळे कोगनोळी ता.निपाणी येथील शेतकऱ्यांच्या समोर मोठी समस्या निर्माण झाली आहे.

वेळो-अवेळी विद्युत पुरवठा बंद करणे अचानक पणे विद्युत पुरवठाचे वेळापत्रक बदलणे मुळे बळीराजा विद्युत पंपा पर्यंत हेलपाटे घालून त्रस्त झाला आहे. त्याचा उद्रेक शनिवारी सकाळी हेसकॉम कार्यालयाजवळ पाहायला मिळाला. शेकडोंच्या संख्येत मोटारवरून शेतकरी बिरोबा माळ हालसिद्धनाथ नगर येथे असणाऱ्या हेस्काँम कार्यालयासमोर एकत्र जमा झाले.

यावेळी शेतकऱ्यांनी उपस्थित कार्यालयातील कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना धारेवर धरुन अनियमित विद्युत पुरवठयाबदल जाब विचारला. जोपर्यंत वरिष्ठ अधिकारी येत नाही तोपर्यंत कार्यालयासमोर हलणार नाही .अशी संतप्त भूमिका शेतकरी वर्गाने घेतली होती.

शेवटी इथून पुढे विद्युतपुरवठा सुरळीत करण्यात येईल असे आश्वासन मिळाल्यानंतरच शेतकऱ्यांनी आपली भूमिका बदलली. विद्युत पुरवठा किती वाजता सुरू होणार याबाबत फोन वरून विचारणा करण्यासाठी कार्यालयाला फोन केल्यानंतर फोन सुद्धा उचलला जात नाही याबाबत ही तीव्र नाराजी उपस्थित शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या.

येथील दूध गंगा नदी फाटा परिसरात शेतीसाठी विद्युत पुरवठा करण्याचे नियोजन कोलमडल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी शनिवारी सकाळी येथील हेस्कॉम कार्यालयाला शेकडोच्या संख्येत घेराव घातला .यावेळी इथून पुढे विद्युत पुरवठा सुरळीत केला जाईल असे आश्वासन संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून उपस्थित शेतकर्‍यांना देण्यात आले.

यावेळी कोगनोळीतील हेसकॉम कार्यालयासमोर घेराव घालण्यासाठी अनंता पाटील, जिउ कगुडे रवींद्र पाटील ,शिवाजी मोरडे ,धीरज मगदूम, शिवाजी मोरडे ,रामचंद्र पाटील, किरण पाटील, महाविर चिंचणे यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here