अकोला जिल्ह्य़ातील शेतकरी कापूस विम्याच्या प्रतीक्षेत…नुकसान होऊनही मदत नाही…यंदाच्या हंगामात पिक विमा काढण्यास उदासीनता

अमोल साबळे

अकोला : परिसरातील शेतकऱ्यांनी गतवर्षी सोयाबीन, तूर, कपाशी या पिकासाठी पीक विमा काढला परंतु नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना केवळ सोयाबीन, मूग, उडीद या पिकासाठी विमा मंजूर केला. असून, अकोला जिल्हातील नुकसानग्रस्त कापूस उत्पादकांना विमा भरपाई प्रतीक्षा कायमच आहे.

गतवर्षीच्या सण २०१९-२०२० या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी विविध पिकाचा विमा उतरविला त्यासाठी विमा कंपनीकडे संबंधित बँकेमार्फत विम्याची रक्कमही देय केली असून त्यात अकोला जिल्हातील शेतकऱ्यांनी कापूस पिकाचा विमा उतरविला होता त्याच्या पावत्याही संबंधित शेतकऱ्याकडे आहेत.

त्यानंतर नोव्हेंबर, डिसेंबर दरम्यान आलेल्या अवकाळी पावसामुळे सोयाबीन, तूर आणि कपाशी पिकाचे अतोनात नुकसान झाले तर जुलैमधील अतिवृष्टी मध्ये उडीद व मुंग पिकाचे नुकसान झाले होते. या पीक नुकसानाचा सर्वे प्रशासकाने केला. त्यानंतर शासनाने नुकसाणग्रस्त शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई ही मंजूर केली.

तथापि यात केवळ सोयाबीन, मुग व उडीद शेतकऱ्यांना विमा भरपाई देण्यात आली. त्यामुळे अकोला जिल्हातील कापूस उत्पादक शेतकरी पिक नुकसान होऊनही मदतीपासून शेतकरी वंचित राहिले आहेत. या संदर्भात शेतकरी संबंधितांकडे चौकशी करित असताना कापूस उत्पादकांना पीकविमा मंजूर करण्याची प्रक्रिया सुर असल्याचे सांगून त्यांची बोळवण केली जात आहे.

यंदाच्या हंगामात उदासीन
अकोला जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पीक विमा काढून आणि नुकसान होऊनही अद्याप पिकविमा भरपाई मिळालेली नाही. शेतकऱ्यांच्या जवळील पीकविमा काढण्यासाठी रक्कम केली असून खरीप हंगामात पेरणीसाठी बी- बियाणे व खत आणण्यासाठी पैसा नसल्याने शेतकऱ्यांना सावकाराच्या दारी जावे लागत आहे. त्यामुळे शेतकरी निरास झाले. असून यंदा कोणत्याही पिकाचा विमा काढण्यासाठी त्यांच्यात उदासीन राहणार असल्याचे दिसून येते आहे.

२०१९ – २०२० मधे कापूस पिकांचा विमा काढला होता.
अतिवृष्टी झाल्याने कापूस पिकाचे अतोनात नुकसान झाले. असून, नुकसान पीकविमा मिळत नसल्याने मागील वर्षी पीकविमा काढल्याने जवळील रक्कम निघून केल्याने आर्थिक संकटात सापडलो आहे.

राजु अढाऊ,अल्पभूधारक शेतकरी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here