‘तांडे सामू चालो’ या लोकोत्तर अभियानांतर्गत शेतकऱ्यांचा सन्मान !

पातूर तालुक्यातील पळसखेड बेलतळा शिवारात कृषिदिनानिमित्त व हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त ‘ तांडे सामू चालो ‘ या लोकोत्तर अभियानांतर्गत ‘ आम्ही सारे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर ही अभिनव मोहिम राबवून जगाच्या पोशिंध्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शेतकऱ्याला नव बळ देण्यासाठी थेट शेताच्या बांधावर शेतकऱ्याचा सन्मान करण्यात आला.

या सन्मानाने गाव शिवार फुलून आले, खऱ्या अर्थाने हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईकांना आदरांजली झाली असे अनेक जाणकारांनी मत व्यक्त केले,यावेळी फळझाड लागवड,मास्क व सॅनीटायजरचे वाटप करण्यात आले

कार्यक्रमला जिल्हा समन्वयक डॉ शांतीलाल चव्हाण निलेश हिवराळे विकास चव्हाण मनोहर पवार संदीप चव्हाण रामगोपाल जाधव देवेंद्र हिवराळे इंदल चव्हाण डॉ कृष्णा जाधव रितेश राठोड अश्विन राठोड प्रमोद हिवराळे अश्विन राठोड वैभव जाधव आदींची प्रामुख्याने उपस्थित होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here