दिग्रस येथील १७ एकरातील शेतकऱ्याचे बियाणे उगवलेच नाही, शेतकरी आर्थिक संकटात कंपनीकडे तक्रार देऊनही दुर्लक्ष…

पातूर – निशांत गवई

पातुर तालुक्यातील कृषी विभाग अंतर्गत येत असलेल्या दिग्रस बु येथील शेतकरी गोपाल त्र्यंबक गवई यांच्या शेतातील सोयाबीनचे बियाणे बियाणे उगवलेच नसल्याबाबत ची तक्रार तालुका कृषी अधिकारी पातूर यांच्याकडे करण्यात आली आहे.

येथूनच जवळ असलेल्या स्थानिक सस्ती येथील बळीराजा कृषी सेवा केंद्र येथून बियाण्याच्या बॅग विकत घेतल्या असता दिग्रस खुर्द येथील गट क्रमांक २०१,२०२ ,१३८,३२ मध्ये ट्रॅक्टर द्वारे पेरणी केल्या, त्याच दिवशीच्या या पेरणी वर पाऊस सुद्धा पडला दुसरा पाऊस सुद्धा त्याच दुसऱ्या दिवशी पडला त्यानंतर गोपाल गवई हे शेतकरी शेतात गेले असता शेतामध्ये बियाणे उगवले नाही असे दिसले.

परंतु माझ्या शेजारील त्या दिवशी पेरणी केलेली दुसऱ्या कंपनीचे बियाणे बाजूच्या शेतात गेले असता ते पूर्णपणे निघालेली दिसली. त्यामुळे मी कृषी सेवा केंद्र संचालक यांना फोनवरून माहिती दिली असता विजय सिड्स कंपनीचे सोयाबीन उगवले नसल्याचे सांगण्यात आले .त्यांनी संबंधित कंपनी चा अधिकाऱ्यांशी संपर्क साधला बियाणे उगवले नसल्याची माहिती दिली कंपनीच्या अधिकारी दुसऱ्या दिवशी शेतात येऊन पाहणी करतो तुम्ही कोठेही तक्रार देऊ नका असे सांगण्यात आले.

तीन-चार दिवस होऊन सुद्धा उत्तर मिळाले नसल्याने शेवटी एक जूनला पुन्हा संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलले नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे कळले .त्यामुळे आज रोजी माझ्या संपूर्ण परिवाराचा उदरनिर्वाह या शेतीवरच अवलंबून असून माझ्या आतापर्यंत बियाण्याचा खर्च, खत पेरणीपासून सर्व खर्च एक लाख 28 हजार रुपये झाला.त्या मुळे माझी मनस्थिती खराब झाली आहे व माझ्यावर दुबार पेरणीचे संकट असल्याची चिंता चिंता सतावत आहे.

माझ्या शेतातील शेतात येऊन पंचनामा करून मला नुसकान भरपाई देण्यात यावी .अशी तक्रार शेतकरी गोपाल गवई यांनी कृषी अधिकारी यांच्याकडे दिलेल्या तक्रारमध्ये नमूद करण्यात आले आहे.

सस्ती येथील बळिराजा कृषी सेवा केंद्रातून सोयाबीन आणली व शेतात पेरणी करून सुद्धा ते बियाणे न उगवल्यामुळे माझ्यावर मोठे संकट व आर्थिक टंचाई पडली आहे.याची योग्य चौकशी करून मला न्याय देऊन नुसकान भरपाई देण्यात यावी.

गोपाल त्र्यम्बक गवई शेतकरी दिग्रस बु चौकट : दिग्रस येथील शेतकऱ्यांची तक्रार आली असून उद्या शेतकऱ्यांच्या शेतात कम्पनी च्या प्रतिनिधी ला बोलाविण्यात आले आहे. पाहणी करून शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

डी एस शेटे तालुका कृषी अधिकारी पातूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here