शेतकरी विधेयक कायदा शरद जोशी यांच्या संकल्पनेतून साकार – मंत्री अनिल बोंडे…

राजगुरूनगर ( पुणे ) – शेतीमाल विकण्याचे स्वातंत्र्य आणि त्यासाठी बाजार समितीच्या बंधनातून मुक्तता व शेती उत्पन्न वाढीसाठी करार पद्धतीने शेती करण्याचे शेतकऱ्याला स्वातंत्र्य यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्याने कायदा करून शेतकरी संघटनेचे प्रणेते स्वर्गीय शरद जोशी यांचे शेतकरी समृद्धीचे स्वप्न पूर्ण केले आहे.

म्हणून आपण शरद जोशी साहेब यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आंबेठाण अंगारमळा येथे आलो आहोत असे विचार राज्याचे माजी कृषिमंत्री आणि भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर अनिल बोंडे यांनी मांडले.यावेळी किसान मोर्चाचे सरचिटणीस सुधीर दिवे, उपाध्यक्ष ललित समदूरकर, कमल सिंह चीतोडिया,

भाजपा पुणे जिल्हा संघटन सरचिटणीस धर्मेंद्र खांडरे, जिल्हा परिषद सदस्य भाजपचे नेते शरद बुट्टेपाटील,तालुकाध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य अतून देशमुख,जिल्हा उपाध्यक्ष संजय रौंधळ, तालुका युवा मोर्चाचे अध्यक्ष काळूराम पिंजन, तालुका उपाध्यक्ष सुनील देवकर,माजी सरपंच दत्तात्रय मांडेकर, शरद निखाडे, कानिफनाथ आंद्रे,प्रदीप मांडेकर आदी उपस्थित होते.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवारांनी आपल्या राजकीय आत्मचरित्रात शेतकरी स्वातंत्र्याचा विचार मांडला, राहुल गांधींनी काँग्रेसच्या मागील निवडणूक किती जाहीरनाम्यामध्ये विचार मांडला ते सोयीस्करपणे विसरले असून केवळ विरोधाला विरोध म्हणून पंतप्रधान मोदी ने आणलेल्या क्रांतिकारी कायद्याला विरोध करत आहे. मुख्यमंत्री होण्यापूर्वी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन दिलेली आश्वासने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विसरले आहेत.परंतु केंद्र सरकारने शेतकरी हिताचा निर्णय घेतला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here