शेतकरी महिलेचा सर्पदंशाने मृत्यू मुंडीपार (खुर्द) येथील घटना…

गोंदिया – अमरदिप बडगे

गोंदिया आता सध्या धान कापणी मोठ्या प्रमाणावर सुरू असुन शेतात महिला धान कापणी करिता जात असतात.अशाच काल आपल्या स्वतःच्या शेतात धान कापणी करीत असताना विषारी सापाने चावा घेतल्यामुळे एका शेतकरी महिलेचा मृत्यू झाल्याची दुःखद घटना गुरुवारी .25नोव्हेबरला गोंदिया तालुक्यातील मुंडीपार खुर्द येथे घडली आहे.

शेतकरी महिलेचा सर्पदंशाने मृत्यू झाल्या मुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. येथील निर्मलाबाई जयराम गौतम वय (55वर्ष ) असे सर्प दंश केलेल्या महिलेचे नाव असुन ती दुपारी १वाजेच्या सुमारास आपल्या घराच्या मागे लागूनच असलेल्या शेतात धान कापणी करीत होती.

अश्यात एका विषारी सापाने तिच्या पायाला चावा घेतला. सदर घटनेची माहिती होताच तिला वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया येथे तात्काळ हलविण्यात आले. परंतु 3 वाजताच्या सुमारास उपचारादरम्यान तीचा मृत्यू झाला. महिला शेतकरी अचानक मृत्यू झाल्याने गावात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.तिच्या मागे दोन मुले, सुना व नातवंड असा परिवार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here