सवणा येथे क्रुषि विभागा मार्फत शेतकरी प्रशिक्षण सपंन्न…

अभिमान सिरसाट

चिखली तालुक्यातील सवणा येथे क्रुषि विभागा मार्फत विजय भुतेकर यांच्या शेतात 28 जानेवारी रोजी शेतकरी प्रशिक्षणा चे आयोजन करण्यात आले होते.सदर प्रशिक्षणास चिखली तालुका क्रुषि अधिकारी अमोल शिंदे,क्रुषि पर्यवेक्षक दिनेश लंबे,क्रुषि विज्ञान केद्र बुलढाणा येथील तज्ञ राहुल चौहान,क्रुषि सहाय्यक अमोल बाहेकर तसेच बहुसंख्य शेतकरी हजर होते.

या मार्गदर्शन करतांना जमिनीत कमी होत असलेल्या सेंद्रिय कर्ब बाबत चिंता व्यक्त करताना सेंद्रिय कर्ब वाढविण्यासाठी शेतातील कुटार काडीकचरा शेतातच खड्डा करुन कुजविण्या बाबत आग्रह धरत वेस्टडिकंपोजर,जिवाम्रुत घरीच तयार करुन शेतीसाठी उपोयोग करावा असे ता.क्रु.अ अमोल शिंदे यांनी त्याच्या मार्गदर्शनात सांगितले.

यानंतर क्रुषि पर्यवेक्षक दिनेश लंबे यांनी अचानक झालेल्या वातावरणातील बदलामुळे फवारणी मध्ये करावयाच्या बदलाबाबत बोलतांना म्हणाले कि धुके व कडाक्याच्या थंडी मुळे फुलाचे घाट्यात रुपांतर होण्यास अडचण येत असुन धुक्या मुळे बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसत आहे त्यामुळे हरभरा पिकावर बुरशीनाशकांची तसेच दोन टक्के युरीया ची फवारणी करुन अळीनाशक ची सुध्दा फवारणी करण्याचा सल्ला देत जेथे घाटे पक्के झाले तेथे पाणि देण्याचा सल्ला दिला.

तसेच के व्हि के बुलढाणा चे राहुल चव्हाण यांनी थंडी व धुक्या पासुन पिकाची काळजी घेण्यासोबतच स्वतः ची काळजी घेण्याबरोबरच जनावरांची कळजी घेण्याचा सल्ला दिला.
या कार्यक्रमा साठी ज्ञानेश्वर शेळके,धंनजय गाढवे,तुळशीदास भुतेकर, बालु खडके,विठ्ठल पवार,संजय भुतेकर,

परसराम भुतेकर, सुर्यकांत करवंदे,शाम शेळके,भगवान देव्हडे,राजेंद्र भुतेकर, सुभाष हाडे,अनिल एखंडे,शंकर खंडागळे,सचिन खडके,पंकज भुतेकर,गणेश भोलाने,तसेच बहुसंख्य शेतकरी हजर होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी क्रुषि सहाय्यक अमोल बाहेकर,विजय भुतेकर ज्ञानेश्वर शेळके यांनी प्रयत्न केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here