पातुर तालुक्यातील पुन्हा शेतकरी राजा हतबल…

पातूर तालुक्यातील छोटेसे गाव खानापूर मधील घटना आज दिनांक 27/6/2020 ला दुपारी शेतातील काम निपटून अत्यल्प भूधारक श्री बाळू उदेभान शिरसाठ खानापूर ला घरी जात असताना,

गोविंदा महाराज चे खोऱ्या मध्ये व गावात जोरदार पाऊस झाल्यामुळे अचानक नाल्याला पूर आला पूर येण्याचे काही वेळ आधी श्री बाळू शिरसाठ यांच्या शेतातील बैल जोडीवरील काम निपटून घरी निघाले असता नाल्याच्या मध्ये पोहचताच अचानक मोठा पूर आला आणि

त्या पुरमध्ये 3 बैल व स्वतः शेतकरी छोट्या बैलगाडी सह वाहून गेले शेतकऱ्याला त्याचा स्वतः चा जीव कसातरी वाचवता आला परंतु 3 बैलांचात्यांचा जीव वाचवता आला नाही 

शेतकऱ्यांनी एवढ्या पुरामध्ये सुधा अतोनात प्रयत्न केले बैलाचे जीव वाचविण्या करिता पुन्हा पुरात उडी घेऊन सुध्धा नाल्याच्या पुरा समोर का निसर्गाच्या नियतीच्या समोर बळीराजाचे एक नाही चालले

आधीच या बळीराजाचे शेती पेरणीची व्यवस्था नसल्यामुळे व शेती कर्ज माफ होऊन सुधा नवीन कर्ज न मिळाल्या मुळे नातेवाईक व गावकरी मंडळींच्या सहायाने त्याचे शेती मशागत व पेरणी करिता बियाणे घेऊन पेरणी करून दिले पण शेवटी त्यात पण त्यांना पुन्हा पेरणी करावी लागलीच निसर्गाच्या लहरीपणा मुळे आणि

आता आधीच्या संकटातून उसनवारी करून कसे तरी निघालेला हा अत्यल्प भूधारक शेतकऱ्यावर पुन्हा नियतीने 1लाख ते 1.5 लाखाचे नुकसान केले अश्या परिस्थिती या शेतकऱ्याला शासनाकडून मदत मिळावी ही आशा जेणे करून शेतकऱ्याचे वर आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here