हंचिनाळ येथे सायकल घसरून विहिरीत पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू…

राहुल मेस्त्री

हंचिनाळ ता.निपाणी येथील एक शेतकरी रात्रीच्या वेळी आपल्या शेतीला पाणी सोडण्यासाठी गेले असता रात्री दोनच्या सुमारास घरी परत येते वेळी मुरूमावरून सायकल घसरल्यामुळे रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत पडल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. तात्यासो भाऊ जाधव वय( 60 )असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी येथील शेतकरी श्री तात्यासो जाधव शेतीला पाणी सोडण्यासाठी रात्रीची दहा ते दोन यावेळेत थ्री फेज लाईट असते म्हणून शेताकडे गेले होते. शेतीला पाणी सोडुन घरी परतत असताना येथील मीठारकी मळ्यात (सर्वे नंबर 147) रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरी जवळून सायकलने येत असताना खडक( मुरम) यावरून सायकल घसरल्यामुळे व विहिरीला संरक्षक कठडा नसल्यामुळे त्यांचा तोल जाऊन सरळ विहिरीत पडले.

रात्री दोनच्या सुमारासची घटना घडल्यामुळे त्यांना कोणीही वाचवू शकले नाही. विहिरीच्या कडेला रस्त्यालगत त्यांची सायकल,टोपी,टावेल,बॅटरी पडलेली असल्यामुळे सकाळी सहानंतर मळ्यातील लोकांच्या घटना निदर्शनास आल्यानंतर सदर घटनेची नोंद निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली .त्यानंतर दुपारी उशिरापर्यंत प्रेताची शोधमोहीम सुरू होती 80 फूट खोली व सभोवताली झाडांचे किचकट असल्यामुळे शोध मोहिमांमध्ये अडचणी निर्माण होत होत्या.

अखेर दुपारी दोनच्या सुमारास मृतदेह सापडल्यानंतर शवविच्छेदन करून उशिराने मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे श्री काडगौडर व हवलदार के आय बडीगेर यांनी पंचनामा केला. श्री जाधव यांच्या पश्चात आई वडील ,दोन भाऊ ,एक बहीण, पत्नी दोन मुले ,एक विवाहित मुलगी ,सून नातवंडे असा परिवार आहे….

!!!यावेळी एका शेतकऱ्यांने काय प्रतिक्रिया दिली ते पाहु!!!!…
“हेसकॉम ₹च्या अनियोजित व आडमुठ्या धोरणामुळे एका शेतकऱ्याचा बळी गेला असून यापुढे तरी हेसकॉमनें शेतकऱ्यांना दिवसा विद्युत पंपाची लाईट देऊन सहकार्य करण्याची गरज आहे. शिवाय गावातील अनेक रस्त्याकडील विहिरींना संरक्षक कठडे नाहीत याची संबंधितांनी गांभीर्याने नोंद घेऊन सौरक्षक कठाडे बांधण्याची काळाची गरज आहे”…
(प्रगतशील शेतकरी श्री अनिल कुरणे ,हंचिनाळ.)

!!!कुळस्वामीचे दर्शन अपुरे राहिले!!!.

“नातेवाइकाकडून मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी सकाळी संपूर्ण कुटुंबीयांसमवेत कुळस्वामी श्री खंडोबा आणि सौंदत्ती यल्लमा देवीच्या दर्शना करिता जाण्याकरिता घरी मुलीसह पाहुणे मित्रमंडळी जमले होते .परंतु रात्री दोनच्या वेळेस सदर घटना घडल्यामुळे मयताला अखेरचे दर्शन होऊ शकले नाही. असा आक्रोश नातेवाइकाकडून व्यक्त होत होता”. .. ..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here