दर्यापूर :- किरण होले
अमरावती जिल्ह्यामध्ये रविवार रोजी संपूर्ण जिल्हा लॉक डाऊन करण्यात आला होता . परंतु अत्यावश्यक सुविधा या सुरू ठेवून बाकी सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले होते. दर्यापूर शहरामध्ये संपूर्ण शहर कडकडीत बंदला जनतेने उत्कृष्ट प्रतिसाद दिला होता.
परंतु पेट्रोल पंप सुरू असल्याने शेतकरी आपल्या शेतीच्या मशागती करिता डिझल घेऊन घरी जात असताना टुविलर वरील दोन्ही शेतकरी युवकांच्या तोंडाला माक्स लावूनसुद्धा पोलिसांकडून त्यांना विनाकारण निर्दयपणे मारहाण करण्यात आली. या मारहाण करताना एक महिला पोलीस कर्मचारी व दोन पोलीस कर्मचारी यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. परंतु एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे म्हणत आहेत
की शेतकऱ्याला शेतीच्या मशागती करता कुठल्याही प्रकारे अडचण निर्माण व्हावी परंतु दुसरीकडे जनतेचे रक्षण करणारे पोलीस विनाकारण शेतकऱ्याला अशाप्रकारे मारहाण करत असेल तर हा एक शेतकऱ्यावर केलेला अन्याय आहे. पोलिसांच्या या कृत्याचा संपूर्ण जिल्हाभर जाहीर निषेध केला जात आहे.
जर पोलिस अशा प्रकारे शेतकऱ्याला मारहाण करून त्यांच्या जीवाची संरक्षण करत असेल तर मग कोनोराने मृत्यू झालेला हा बरा असा प्रश्न आता शेतकरी बांधव उपस्थित करीत आहे.
कोट:- पोलीस सर्वसामान्य जनतेचे रक्षण शेतकऱ्यांना मारहाण करून करत असतील तर त्यांनी त्यांची ही मर्दांगी , व लाठी सर्वसामान्य जनता व शेतकऱ्यां वर न वापरता गुन्हेगारावर वापरली तर बरे होईल. दर्यापूर तालुक्यात दारूची अवैध धंदे , गुटख्याची सर्रास विक्री होत असताना त्यांच्याकडे काय दुर्लक्ष केले जात आहे .
एडवोकेट. विद्यासागर वानखडे