शहापुर बहुत प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने पणज धामणगाव परीसरातील शेत रस्ते बंद…

शेतकऱ्यांचा शेतीशी संपर्क तुटल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान.

अकोट – कुशल भगत

अकोट तालुक्यातील ग्राम पणज सह धामणगाव परीसरात गेल्या ८ते १० दिवसा पासून रीमझीम पाऊस सुरू असल्याने या परिसरातील शहापूर प्रकल्पाच्या पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. असुन या परीसरातील शेत मौजे धामणगाव पणज शेत शिवरात असलेल्या शेती मध्ये तसेच शेत रत्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने हे शेताकडे जाणारे रस्ते चिखलमय झाल्याने,शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून येत आहे.

ऐन पिक काढणीच्या वेळेवर शेता मध्ये जाने किंवा येणे शेतकऱ्यांना शक्य होत .नसल्याने शेतकऱ्यांचा व शेताचा संपर्क तुटला आहे शेतकऱ्यांनी आधीच पैशाची जुळवाजुळव करून पेरणी पुर्ण केली होती. परंतु यावर्षीच्या दमदार पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे .मागील वर्षी पेक्षा या परीसरात पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे घरात येनारे पिके संकटात दिसत आहे.

शहापूर प्रकल्पात या वर्षी मोठ्या प्रमाणात पाणी साठा वाढला असुन या प्रकल्पातील पाणी शेताकडे जाणाऱ्या रत्यावर आल्याने शेताचा व शेतकऱ्यांचा संपर्क तुटला आहे. तसेच आपण आपल्या शेतात कसे जाणार अशी चिंता शेतकऱ्यांना लागली आहे आणी शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाण्यासाठी दुसरा पर्यायी मार्ग नसल्याने शेतकऱ्यांचा व शेतीचा संपर्क तुटला असल्याने यावेळी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

तरी या पणज धामणगाव रत्याची पाठ बंधारे विभागाने प्रत्येक्ष पाहणी करून रत्यांची उंची वाढवावी तसेच हा रस्ता दुरुस्त करून देण्यात यावा कारण या धामणगाव रत्यावर भरपूर शेतकऱ्यांची शेती असुन शेती मालाचे १०० टक्के नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी या परीसरातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी. किंवा रत्याची उंची त्वरीत वाढविण्यात यावी जेणेकरून शेतात जाण्या करीता रस्ता मोकळा होईल व शेतकऱ्यांच्या शेतमालाचे नुकसान होनार नाही.

तर पाठबंधारे विभाग अकोला यांनी या समस्येकडे लक्ष देवुन ताक्काळ काही तरी दखल घ्यावी व या पणज धामणगाव परीसरातील शेतकऱ्यांना न्याय व दिलासा देण्यात यावा अशा मागणीचे निवेदन पाठबंधारे विभाग अकोला यांना दिनांक २३ सप्टेंबर बुधवार ला देण्यात आले आहे. आधीच शेतकऱ्यांना अनेक संकटांचा सामणा करावा लागत असून हे वेगळेच संकट शेतकऱ्यां समोर उभे झाल्याने शेतकरी वर्ग पुर्णपणे हवालदिल झाला आहे.

आपल्या शेतामध्ये लाखो रुपये खर्च करून शेतकऱ्यांनी पिकांना जिवनदान दिले,परंतु या अशा दमदार पावसाच्या तडाख्याने शेतकऱ्यांचे नुकसान होतांना दिसत आहे. पाठबंधारे विभागाच्या हलगर्जीपणा मुळे तोंडाशी आलेले सोयाबीन केळी ज्यारी तुर हे पिक घरात येणार कि नाही अशी चिंता शेतकऱ्यांना लागली आहे.

तरी शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी उपाययोजना करावी अशी मागणी या परिसरातील शेतकरी यांच्या कडून होत आहे. अहोरात्र मेहनत करून तसेच लाखो रुपये खर्च करून शेवटी शेतकऱ्यांच्या हाती निराशाच आली असल्याचे चित्र दिसत आहे.

या मागणीचे व समस्थेचे निवेदन सादर करण्यात आले यावेळी हरीभाऊ पायघन, रामदास तायडे, मधुकर कोल्ले ,संजय आकोटकर ,ज्ञानेश्वर चिंचोळकार, कैलास तायडे ,विजय भारसाकळे, गोपाल अस्वार ,उत्तमराव आकोटकर ,संतोष डिके, कैसर खा ,पठान शहिद पटेल यांची उपस्थिती होती.

पाटबंधारे विभागाचे अनिकेत गुल्लाने सहाय्यक अभियंता श्रेणी १ तसेच वाघ साहेब ,नायबतहसीलदार गुरव साहेब अकोट यांनी नुकसान झालेल्या शेतीथची पाहणी केली.व नुकसानीचा अहवाल पुढे पाठवुन शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असल्याचे यावेळी बोलताना सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here