कायदेशीर व्यवहार, दूर ठेवी भ्रष्टाचार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग वाशिम कडून जनजागृती सुरू…

भ्रष्टाचार निर्मुलन दक्षता जनजागृती सप्ताहा अंतर्गत भ्रष्टाचाराला प्रतिबंध करण्याचे दृष्टीने लाचलुचपत प्रतिबंधक युनिट वाशिम कडून वाशिम शहर व संपूर्ण जिल्ह्यात जनजागृती सुरू असून दिनांक 26/10/21 ते 1/11/21 दरम्यान भ्रष्टाचार निर्मुलन दक्षता जनजागृती सप्ताहा अंतर्गत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले,

असून त्या मध्ये विविध घोषवाक्ये लिहलेले पत्रके वाटप, गर्दीच्या ठिकाणी भित्तीपत्रके चिपकविणे, शाळा, महाविद्यालयात चर्चा सत्रे, विविध समाज माध्यमावर रेडिओ वर भ्रष्टाचार प्रतिबंधाचे अनुषंगाने प्रचार/प्रसार करणे,

तालुक्याचे ठिकाणी बाजाराचे दिवशी भ्रष्टचार कसा रोखता येऊ शकतो ह्याची माहिती देणारे पथ नाट्य आयोजित करण्यात आले आहे, सदर जनजागृती मोहीम लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे अमरावती परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, अप्पर पोलीस अधीक्षक अरुण सावंत, वाशिम युनिट प्रभारी पोलीस उपअधीक्षक गजानन शेळके ह्यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरज कांबळे , ममता अफूने व वाशिम युनिट चे अंमलदार राबवित आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here