ज्येष्ठ अभिनेत्री आशालताजी ह्यांचे प्रतिभा हाॅस्पिटल सातारा येथे दु:खद निधन आज सकाळी ४.४५ वाजता झाले.आशालता वाबगावकर अगदि कमी कालावधीत सर्व महाराष्ट्राच्या लाडक्या आशालता झाल्या.
चंद्रलेखाच्या मत्स्यगंधा या व्यावसायीक नाटकापासुन त्यांच्या करियरची सुरवात झाली आणि नंतर त्यांनी चंद्रलेखाची बरीच नाटकं केली. हळूहळू मराठी व हिंदी चित्रपट ही केले आणि स्वतःच एक स्थान त्यांनी निर्माण केल. सुस्वभावी आणि मोकळेपणे गप्पा करणारी एक चांगली अभिनेत्री आपल्यातून आज गेली.
भावपूर्ण श्रद्धांजली
- गणेश दत्तात्रय तळेकर