प्रसिद्ध व्याख्याते प्रबोधनकार इंद्रजीत देशमुख यांची पुण्यश्लोक अहील्यादेवी होळकर स्मारकास सदिच्छा भेट…

सांगली प्रतिनिधी :– ज्योती मोरे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकास येथे प्रबोधनकार इंद्रजीत देशमुख यांनी सदिच्छा भेट दिली. मा. देशमुख सर यांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

अभिवादनानंतर पंचायत समिती गटविकास अधिकारी मा. आप्पासाहेब सरगर, नगरसेवक मा. विष्णू माने, प्रा. मा. आर एस चोपडे आणि डॉ. दिलीप मगदुम यांचे हस्ते स्मारक समितीवतीने मा. इंद्रजीत देशमुख साहेब यांचे स्वागत-सत्कार करण्यात आले.

यावेळी झालेल्या बैठकीत मा. इंद्रजीत देशमुख यांनी स्मारकास परिसर, ग्रंथालय पाहुन आनंद व्यक्त केला. स्मारक ही वास्तू प्रबोधनाची आणि सामाजिक चळवळीचे केंद्र करावे, येथे बालकांपासून वृद्धांपर्यत विविध विषयांवर विविध स्तराची शिबीरे, प्रशिक्षण वर्ग राबवून लोकोपयोगी मार्गदर्शन केद्र निर्माण करावे. त्यासाठी हवी असलेली सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले.

या बैठकीस सर्व मा. इंजि. शिवाजी शेंडगे, अॅड सुधीर गावडे, गणेश बुधे , मदन यादव साहेब, प्रविण कोकरे, साहित्यक गोरे, दयानंद शिवशरण, प्रा. गौतम शिंगे, पंडित सोलनगर, गणेश माने, खरात सर, संतोष कदम सर, महिला व बालविकास अधिकारी सौ. विजयमाला खरात मॅडम, सौ. माया गडदेपाटील मॅडम, सौ. कृष्णाली शिवशरण आदी उपस्थित होते. बैठकीचे प्रस्ताविक व सुत्रसंचलन, आयोजन निवांत कोळेकर सर यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here