अकोल्यातील प्रसिध्द डॉक्टरचा प्रताप…रुग्णासोबत अनैसर्गिक कृत्य केल्याच्या आरोपाखाली अटक…

अकोला शहर हे पश्चिम विदर्भातील प्रसिद्ध हॉस्पिटलमुळे एक वेगळी ओळख आहे, येथे जिल्ह्यातील एका प्रसिद्ध डॉक्टरानं रुग्णालयात भरती असलेल्या रुग्णासोबतच अनैसर्गिक संबंध ठेवण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. डॉ.अनंत शेवाळे डॉक्टरचं नाव असून पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

डॉ.शेवाळे जिल्ह्यातील प्रसिद्ध नेत्ररोगतज्ज्ञ आहेत. या प्रकरणी एका स्थानिक यूट्युब चॅनलच्या प्रतिनिधीनं तक्रार दाखल केली आहे. काही दिवसांपूर्वी पीडित व्यक्तीच्या मित्रासोबत डॉक्टरनं अनैसर्गिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला.याबद्दलची सत्यता पडताळण्यासाठी तक्रारदार रुग्ण बनून डॉक्टरांकडे गेला. त्यावेळी डॉक्टरांनी त्याचे कपडे उतरवले आणि त्याच्या अनैसर्गिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला.

रुग्ण बनून गेलेल्या यूट्यूब चॅनलच्या प्रतिनिधीनं या घटनेचं स्टिंग ऑपरेशन केलं.ही घटना ४ ऑक्टोबरला घडली. त्यानंतर व्हिडीओ पुराव्यांच्या आधारे तक्रारदारानं डॉक्टरविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली.पोलिसांनी व्हिडिओची सत्ता पडताळून घेतली आणि अखेर डॉक्टरविरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम ३७७ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here