जैतपुर व दोकेसरान्डी येथे घरांची पडझड…आपतग्रस्तांची नुकसान भरपाईची मागणी…

लाखांदूर – नास्तिक लांडगे

गत दोन दिवसापूर्वी लाखांदूर तालुक्यात झालेल्या रिपरिप पावसामुळे तालुक्यातील जैतपुर व दोकेसरान्ड़ी येथे घरांची पडझड झाल्याची घटना घडली.सदर घटना गत 28 ऑगष्ट रोजी रात्रो 9 वाजता दरम्यान घडली असुन सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवित हानी झाली नाही.

कवळु सखाराम कोराम (58)रा.जैतपुर व किशोर जानबा मेश्राम (30)रा.डोकेसरान्ड़ी अशी क्षतीग्रास्त नागरिकांची नावे आहेत.प्राप्त माहिती नुसार घटनेतील दोन्ही कुटूंब तालुक्यातील दोन भिन्न गावात जुनाट व पडक्या घरात कुटुंबासह वास्तव्यास आहेत.

दोन्ही कुटुंबांनी शासनाकडे दोन वेगवेगळ्या योजनेतून घरकुल लाभाची मागणी केली आहे.त्यापैकी किशोर जानबा मेश्राम या गरिब लाभार्थ्याला सन 2019-20या वर्षात शासनाच्या रमाई आवास योजनेंतर्गत घरकुल मंजुर देखील करण्यात आले आहे.

मात्र शासनाने गत तीन वर्षापासून सबंधित योजनेचा निधी उपलब्ध न केल्याने तालुक्यात जवळपास 300घरकुल रखडले आहेत.तर जैतपुर येथील कवळु सखाराम कोराम यांनी देखील घरकुल लाभासाठी शासनाकडे अर्ज केला असल्याची माहिती देण्यात आली.

दरम्यान मागिल 27-28ऑगष्ट रोजी तब्बल दोन दिवस पावसाची रिपरिप सुरु असतांना रात्रो 9 वाजताचे सुमारास घटनेतील दोन्ही पिडीतान्चे घराची पडझड होवुन मोठे नुकसान झाले आहे.या घटनेत दोन्ही कुटुंबाचे घरातील अन्नधान्न्याची देखील नासाड़ी झाली आहे.

याप्रकरणी शासन प्रशासनाने तात्काळ दखल घेउन क्षतीग्रास्त कुटुंबांना घरकुल योजनेचा लाभ देण्यासह तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आपादग्रस्त कुटुंबियांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here