अखेर धान खरेदी ला शासनाकडून ८ फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ – आमदार जयस्वाल यांच्या प्रयत्नाला यश…

हजारो शेतकऱ्यांची धान खरेदी प्रतिक्षा संपली…

रामटेक – राजु कापसे

महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळ व महाराष्ट्र राज्य पणन विभागा मार्फत धान खरेदी सुरु करण्यात आली होती.खरीप हंगाम वर्ष २०२१ – २२ करिता ३१ जाने २०२२ पर्यंत धान खरेदीची मुदत देण्यात आली होती.परंतु एवढया अल्प कालावधित सर्व शेतकर्‍यांची धान खरेदी करणे शक्य नव्हते,त्यामूळे धान खरेदीकरिता मुदतवाढ मिळण्याबाबत शेतकर्‍यांकडून वारंवार मागणी होत होती.

शेतकर्‍यांची मागणी लक्षात घेता आमदार आशिष जयस्वाल यांनी राज्याचे मुख्यमंञी उद्धव ठाकरे व अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंञी छगन भुजबळ यांना धान खरेदी मुदतवाढ देण्याबाबत पञ देवून मागणी केली होती.याची तात्काळ दखल शासनाने घेतली. महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळ व महाराष्ट्र राज्य पणन विभागाच्या  धान खरेदीला दि.८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

उपरोक्त मुदत वाढीमुळे शेतकर्‍यांना फायदा होणार असून जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी मुदतवाढीचा लाभ घ्यावा,असे आ.आशिष जयस्वाल यांनी सांगितले.धान खरेदी केंद्रावर धान खरेदी करण्याची मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

वाढीव मुदतीपर्यंत सर्व शेतकर्‍यांची धान खरेदी करणे शक्य नसल्याने प्रतिक्षाधीन शेतकर्‍यांची खरेदी करण्याकरिता मुदतवाढ देणे अत्यंत गरजेचे आहे.करिता आदिवासी विकास महामंडळ व महाराष्ट्र राज्य को आपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन मार्फत सुरु असलेल्या धान खरेदी करिता दि.३१ मार्च २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी आमदार आशिष जयस्वाल यांनी अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंञी ना.छगन भुजबळ यांना पञाद्वारे केलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here