बोदवड तालुक्यातील कोल्हाडी येथील मुक्ताई इंटरप्राइजेसचा विस्फोटक परवाना रद्द…

बोदवड – गोपीचंद सुरवाडे

कोल्हाडी येथे मुक्ताई इंटरप्राइजेस च्या नावाखाली दि 16/08/2012पासून खुलेआम विस्फोटक पदार्थांची साठवणूक करून विक्री करणाऱ्या मुक्ताई इंटरप्राइजेसचे नाहरकत प्रमाणपत्र अटी व शर्तीची पूर्तता न केल्यामुळे जळगांव चे जिल्हा अधिकारी अभिजित राऊत यांनी विस्फोटक परवाना रद्द केला आहे,

मे,मुक्ताई इंटरप्राइजेस या फर्मचे अतुल मधुकर राणे विद्या नगर बोदवड यांनी कोल्हाडी शिवारात मुक्ताई इंटरप्राइजेसच्या नावाखाली गट क्रं 47 मध्ये स्फोटकाचे गोडाऊन बांधकाम केले होते,हे बांधकाम करतांना शेजारच्या शेतकऱ्यांची संमती,

ना घेता,व औद्योगिक प्रयोजनासाठी अकृषिक परवानगी बाबतचा दाखला,न घेता तसेच विस्फोटक अधिनियम 2008चे कलम 102 व103 चेपालन करता नाहरकत प्रमानपत्रातील नमूद अटी व शर्तीचे पालन न केल्या मुळे नाहरकत प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे. याबाबत गावातील उषा गजानन चौधरी,

सुमानबाई मुऱ्हा चौधरी रा कोल्हाडी ता बोदवड जिल्हा जळगांव, व सुनील पाटील शिव सेना विधानसभा क्षेत्र प्रमुख मुक्ताईनगर रा मुक्ताईनगर यांनी तक्रार दाखल केली होती, या गैर प्रकाराकडे महसूल विभाग व पोलीस खाते हप्ताखोरी मुळे दुर्लक्ष करीत होते का असा प्रश्नजनतेतून विचारला जात आहे,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here