तारापूर औद्योगिक वसाहतीत मधील रासायनिक प्रक्रिया कारखान्यात स्फोट…

स्फोटात दोन कामगार जखमी.

मनोर – पालघर तालुक्यातील तारापूर औद्योगिक वसाहती मधील रासायनिक प्रक्रिया करणाऱ्या कारखान्यात मंगळवारी (ता.22) रात्री सव्वा दहा वाजताच्या सुमारास स्फोट झाला होऊन आग लागली होती.अपघातात जखमी झालेल्या दोन कामगारांना बोईसर मधील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघाताची माहिती कारखाना व्यवस्थापकडून लपविण्यात आली होती,परंतु सोशल मीडियावर अपघाताचे फोटो व्हायरल झाल्यानंतर अपघाताची माहिती अग्निशमन दल आणि बोईसर पोलिसांना देण्यात आली.वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे औद्योगिक वसाहती लगतच्या क्षेत्र आणि कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

आरती ड्रग्ज नामक उद्योग समूहाच्या तारापूर औद्योगिक वसाहती मधील प्लॉट क्रमांक N 198 या कारखान्यात रासायनिक प्रक्रिया सुरू असताना स्फोट होऊन आग लागली होती.यात प्रदीप पाटील आणि शांताराम जाधव हे कामगार जखमी झाले होते.

कारखान्यातील रात्रपाळीवरील कामगारांनी अपघातामुळे लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवले.कारखान्यातील स्फोटाची माहिती उशिरापर्यंत अग्निशमन दल आणि स्थानिक पोलिसांना देण्यात देण्यात आली नसल्याची माहिती पुढे आली होती.सोशल मिडीयावर अपघाताचे फोटो व्हायरल झाल्यानंतर अपघाताची माहिती अग्निशमन दल आज पोलिसांना मिळाल्याचे समजते.

तारापूर औद्योगिक वसाहती मधील प्लॉट क्रमांक ग60 या करखान्यात दहा दिवसांपूर्वी (ता.12) दुपारी दीड वाजताच्या सुमारास संजय सोनी (वय.45) नामक कामगाराच्या अंगावर ऍक्टर मधील रसायन पडून गंभीर जखमी झाला होता.कारखाना व्यवस्थापनाकडून दुर्घटनेची माहिती लपविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.परंतु सोशल मिडीयामुळे अपघाताची घटना उघडकीस आली.

हा तारापूर औद्योगिक क्षेत्रात वारंवार होत असतात परंतु नामांकित आणि तारापूर इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन आणि सामूहिक प्रक्रिया केंद्रात वर्चस्व असलेल्या कारखानदारांकडून याअपघातांची माहिती लपवून कारखाना सुरक्षा कायदा पायदळी तुडवला जात आहे. त्यामुळे औद्योगिक वसाहती लगतचा परिसर आणि कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here