वसंतराव नाईक प्रतिष्ठान व वनराई फाऊंडेशन नागपूर द्वारा आयोजीत प्रयोगशील शेतकरी पुरस्कार २०२१…

शरद नागदेवे

नागपूर – हरित क्रांतीचे प्रणेते व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व.वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्तने प्रयोगशील शेतकरी पुरस्कार २०२१ कार्यक्रमाचे आयोजन दि.१जुलै २०२१ रोजी दुपारी २:०० वाजता श्रीमंत बाबुराव धनवटे सभागृह, राष्ट्रभाषा संकुल ,नविन ओकहार्ट हॉस्पिटलचा मागे शंकर नगर , नागपूर येथे करण्यात आला आहे.

कार्यक्रमाचे उद्घाटन माजी मंत्री आ‌.सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते व प्रमुख अतीथी म्हणून डॉ.चारूदत्त डी.मायी लाभणार असून कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी डॉ.गिरीश गांधी, विश्वस्त वनराई व प्रमुख उपस्थितीत आ.अॅड.निलय नाईक लाभणार आहेत..

पुरस्काचे मानकरी संत्र्याच्या लागवडीत व पाण्यासाठी नविन तंत्रज्ञान वापरुन विविध प्रयोग करणारे नागपूर जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकरी धीरज जुनघरे ठरले आहेत.

विनीत – सौ.प्रगती अजय पाटील,सचिव वसंतराव नाईक प्रतिष्ठान,आ.विकास ठाकरे,संजय पैदलेवार,अनंतराव घारड,अजय पाटील,निलेश खांडेकर,डॉ.पिनाक दंदे,सुधिर बाहेती,किशोर धारिया, अरविंद पाटील,समीर सराफ,अॅड.निशांत गांधी व वनराई फाऊंडेशन परिवार
सहकार्य – वसंतरावजी नाईक अधिकारी कर्मचारी संघटना.

1 COMMENT

  1. अभिमानास्पद कार्य👍🙏
    या2022च्या पुरस्कारासाठी प्रस्ताव कधी व कसा कुठे सादर करायचा याची माहिती कृपया दयावी 9049816090

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here