जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष,महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री…
सांगली – ज्योती मोरे
भारतातील पहिलेच व सर्वात मोठे ११११ गड किल्ल्यांच्या फोटोंचे भव्य प्रदर्शन सांगलीमधील कच्छी जैन भवन राममंदिर कॉर्नर येथे आजपासून १५ फेब्रुवारी २०२२ पर्यत आयोजित करण्यात आले आहे.या भव्य फोटो प्रदर्शनाचे उदघाटन आज पार पडले.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज,राजमाता जिजाऊ, छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या,पराक्रमाने,बलिदानाने हिंदवी स्वराज्याची निर्मिती झाली. त्यासाठी असंख्य मावळ्यांनीही आपले रक्त सांडले आणि त्यांना महत्वाची साथ लाभली ती ह्या गडकिल्ल्यांची.किल्ले हे नेहमी महाराजांच्या आणि मावळ्यांच्या पुढे ढाल म्हणून उभे राहिले. एकेकाळी ही आपली घरचं होती.

त्यांचा ज्याज्वल इतिहास तरूणांच्या मनात रूजवण्याची खरी गरज आहे.या किल्ल्यांचे मूळ रूप फोटोच्या माध्यमातून दाखवण्यात येत आहे.महाराष्ट्रात एकूण साडेतीनशेच्या वर किल्ले आहेत. पण लोकांना मोजकेच किल्ले माहीत आहेत.म्हणूनच भारतातील पहिलेच व सर्वात मोठे 1111 गड किल्ल्यांचे फोटो प्रदर्शन ठेवण्याचा संकल्प आम्ही व आमच्या टीमने केला आहे.
आपण जो इतिहास जपू शकतो तो म्हणजे गड किल्ले.या फोटो प्रदर्शन पाहिल्यानंतर अस लक्षात येत की, प्रत्येकाने आपापल्या परिसरातील गड किल्ले संवर्धन केले पाहिजे.जेणे करून आपल्या पुढील पिढीला पुस्तकांसोबतच वास्तविक ज्ञान सुध्दा मिळायला हव.

माझे सहकारी,संस्थापक संचालक – पुणे आय.ए.टी चे मा. भारत पाटील,दुर्गअभ्यासक ॲड.मारुती आबा गोळे यांनी अत्यंत चांगल्या पध्दतीने याच नियोजन करत आहेत.माझी सर्वच तरुण सहकार्यांना,शिवप्रेमींना,इतिहासाची आवड असणारे यांना विनंती आहे की सर्वांनी या भव्य गडकिल्ले फोटो प्रदर्शनाचा लाभ घ्यावा.या फोटो प्रदर्शनाला डि.वाय.एस.पी.अजित टिके यांनी सदिच्छा भेट दिली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली,मिरज,कुपवाड महापालिकेचे महापौर मा.दिग्विजय सूर्यवंशी, राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष राहुल पवार गटनेते मैनुद्दीन बागवान,सुरेश आण्णा पाटील,पद्माकर जगदाळे,शेखर माने,सचिन जगदाळे,अमित शिंदे,शुभम जाधव,संजय तोडकर,सुनिल भोसले,अभिजित रांजणे,

यांच्यासह प्रमुख पदाधिकारी,सर्व फ्रंटल सेलचे प्रमुख,युवक,युवती,महीला,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या प्रदर्शनासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज व युवक शहर जिल्हाध्यक्ष राहुल पवार त्यांनी अत्यंत नेटके नियोजन केले आहे