Exclusive | चंद्रपूर जिल्ह्यातील खरे दारू माफिया कोण?…४०० रुपये पेटीच काय रहस्य…जाणून घ्या…भाग १

आज चंद्रपूर जिल्हात दारूबंदी असून सुद्धा सर्रासपणे दारू विक्री होते तर आज आमदाराने मुद्देमालासह कोट्यावधी रुपयांचा असलेला अवैध दारूचा साठा पकडून पोलिसांच्या स्वाधीन केल्या गेला आहे. मात्र जिल्ह्यात दारूबंदी केवळ कागदावर असल्याचे बोलले जाते हे खरे आहे. जिल्ह्यात खाकी पासून ते खादी व सामान्य नागरिकांनाही याची माहिती आहे. तर जिल्ह्यात दारू येते कोठून आणि कशी ?

चंद्रपूर जिल्ह्याला लागूनच असलेले दोन जिल्हे नागपूर आणि यवतमाळ या दोन ठिकाणावरून जिल्ह्यात दारू येते, त्यासाठी दारू तस्कर ट्रक मध्ये सिमेंट, भाजीपाला व विविध प्रकारच्या वस्तूंच्या मागे दारू लपवून घेऊन जिल्ह्यात येतात. तर दुसरा मार्ग म्हणजे नागपूर येथील दारू ट्रेडर्स यवतमाळ जिल्ह्यात दारू साठा पाठविण्यासाठी T P वापर करतात म्हणजे जिल्ह्यातून वाहतूक करण्याची परवानगी. मात्र हि परवानगी माहिती प्रमाणे ५ वाजता आत असणे बंधन कारक असून मध्यरात्री १० च्या सुमारास वाहतूक का करतात?

यवतमाळचा दारू ट्रेडर्स जिल्ह्यातील वणी या तालुक्यात माल पाठविण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील काही गावातून वाहतून करून ट्रक वणी येथे आणल्या जातो मात्र तोपर्यंत ट्रक पूर्ण खाली होऊन जातो, त्याच प्रमाणे यवतमाळचा दारू ट्रेडर्स नागपूर जिल्ह्यात ब्रँड पोहचविण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्याचा वापर करून माल चंद्रपुरातच खाली करून मोकळे होतात. वाहतुकीची मात्र वेळ ही रात्री १० नंतरची असते.

चंद्रपुरात अनेक दारू तस्कर आहेत यापेक्षा मोठे तस्कर म्हणजे खाकितील खास दोन लोक त्यातील एकावर ४२० चा गुन्हा दाखल आहे. हे ठरवितात जिल्ह्यात कोणाला व्यवसाय करू द्यायचा की नाही. हे दोन लोक दारू तस्करांकडून एका पेटीवर ४०० प्रमाणे रुपये आकारात आणि टार्गेट सुद्धा देतात. या चारशे रुपयात चार भाग केले जातात एक भाग खादी दुसरा खाकी त्याच बरोबर १५० दोघांचे वेगळे आकारले जातात. आणखी विशेष म्हणजे अगोदर या संपूर्ण जिल्ह्याची वसुलीची जबाबदरी एकट्यावर होती मात्र एकट्याने एवढ सांभाळणे कठीण असल्याने या सोबतीला घेतले.

सर्व सत्ता या दोघांच्याच हातात असल्याने यांनाच माहिती असते किती माल आज उतरविला गेला. ८०० सांगून दोन हजार पेट्या उतरवितात मात्र वरिष्ठाला हिशोब ८०० पेटीचाच हिशोब देतात, त्यात त्याचे १५० रुपये वेगळे, ते सुद्धा वरिष्ठाना माहिती नाही. मात्र हेच दोघे वरिष्ठ बदनाम होतात.

या दोघांनी अवघ्या डिपार्टमेंट अनेकांच्या नाकात दम आणला असून हे दोघेच मलाई खातात. रात्रीच्या कारवाई झाली तेव्हा हे दोघेही पकडलेल्या दारूच्या वाहनाच्या सोबत पेट्रोलिंग ला होते, मात्र आमदारांनी यांचे नाव घेतले नाही. आणि सर्व श्रेय स्वताकडे घेतले.

या सर्व पेट्यांची हिशोबाची तारीख ठरलेली आहे, महिन्यात 8 ते 10, 18 ते 20, 28 ते 30 या कालावधीत पेमेंट द्यावा लागतो यासाठी वसुली करणारे खाकितील तीन लोकच करतात आणि दारू तस्करांना या चारशे रुपयांचा हिशोब ही देतात. या तिघांच्या संपूर्ण जिल्हाच ताब्यात असल्याने खादीतील मर्जीतील तस्करांना येथे दारू तस्करीची मुभा आहे. त्याव्यतिरिक्त असलेल्यावर कारवाई करतात. त्यात किरकोळ विक्री करणाऱ्यांना टार्गेट करून फोटो काढून कारवाई झाल्याची पेपरबाजी करून मोकळे होतात. मात्र मोठे दारू तस्कर सोडून देतात.

(क्रमश) पुढील भाग उद्या…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here