Exclusive पुनर्वसित नविन तलईबोरवा गावातील आदीवासी लुटारु दलालांच्या विळख्यात…अनेक अधिकारी व सज्जनांची दलालाना साथ…आदीवासिना मसिहाची प्रतिक्षा

आकोट, संजय आठवले

तेल्हारा तालूक्यातील हिवरखेड नजिक पुनर्वसित करण्यात आलेल्या नविन तलईबोरवा ह्या आदीवासी गावातील आदीवासी दलालांच्या विळख्यात सापडले असुन त्यांचेकडून आदीवासीना पुर्णपणे देशोधडीला लावले जात असल्याची खळबळजनक माहिती मिळाली आहे. ह्यातही धक्कादायक प्रकार म्हणजे अनेक प्रशासकिय अधिकारी तथा समाजातील कावेबाज सज्जन ह्या लुटारु दलालाना सामील असल्याने आपल्याला वाचविण्यासाठी कुणी मसिहा येईल का? ह्या प्रतिक्षेत हे आदीवासी नजरा लावून बसले आहेत.

आदीवासींचे वन्य प्रकल्पासाठी आरक्षित ठिकाणाहून अन्य ठिकाणी पुनर्वसन करण्याचे शासकिय धोरणानुसार तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड नजिक नविन तलईबोरवा हे गाव सन २०१५-१६ मध्ये स्थापित करण्यात आले, या गावातील सर्वच स्थलांतरित आदीवासीना स्थलांतरापोटी शासनाकडून मोठ्या रकमा देण्यात आल्या आहेत. ह्या रकमा ह्या आदीवासीना व्यवसाय करणे, वाहन खरेदी, शेती खरेदी अशा ऊपजिविकेच्या दिर्घकालीन गरजांसाठीच देण्याचा शासनाचा दंडक आहे. जेणेकरुन आदीवासींच्या राहणीमानाचा स्तर ऊंचावा हा शासनचा हेतू आहे. दैनंदिन खर्च, साधारण आजार, विवाह सोहळे यांकरिता हा पैसा दिला जात नाही. योग्य कारणांसाठीच हा पैसा दिला जावा ह्याकरिता ऊपविभागिय महसूल अधिकारी यांचे अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात येते.

ही समिती योग्य कारणाखेरिज पैसे देण्यास मंजुरी देत नाही. परःतु जो पैसा आपला आहे तो आपल्याला कोणत्याही कामासाठी बेरोकटोक मिळावा आशी या गावातील आदीवासिंची भावना आहे. ह्याच भावनेच्या तिव्रतेने हे संपूर्ण गाव लुटारु दलालांच्या कचाट्यात सापडले आहे. दैनंदिन खर्च व अन्य चैन करण्यासाठी हे दलाल आदीवासीना कर्जाऊ रकमा देतात. नंतर अधिका-यांशी संधान साधून पैसा मंजूर होण्यासाठी मोठे कारण दाखवून त्या सःदर्भातील कागदपत्रे तयार करतात. पैसे मंजुर झाल्यावर आवाच्या सवा व्याज लावून आदीवासीन लुटतात. हे सारे प्रकार ज्यांचेसमक्ष नित्य घडतात त्या एका बँकेच्या कर्मचा-यांची प्रतिक्रिया फारच बोलकी व मानवी मनाला सुन्न करणारी आहे. त्या कर्मचा-यानी सांगितले कि, आदीवासी पैसे घेण्यासाठी बँकेत येतात तेःव्हा हे दलाल त्यांच्या पाठीच असतात. बँकेच्या काऊंटरवरुन मिळालेले पैसे पिशवीत टाकून हे आदीवासी बाहेर पडताच हे दलाल पैशाःची पिशवी त्यांचेकडून हिसकुन आपले ताब्यात घेतात.

आदीवासीच्या हाताला छदामही लागत नाही. अवाक होऊन ते बिचारे पाणावल्या नजरेने त्या दलालाना पैसे घेवून जाताना बघतच राहतात. आदीवासीना राजरोसपणे लुटण्याचा हा प्रकार पाहून मनाला यातना होतात. पण आम्ही काहीच बोलू किंवा करु शकत नसल्याची खंत या बँक कर्मचा-यानी व्यक्त केली. ह्या क्रुर प्रकारासोबतच आदीवासीना ठकवून त्यांच्या पैशानी घेतलेली वाहने शो रुममधून सरळ आपल्या ताब्यात घेणे, “तेरा खाता बंद हो रहा है. ईसलिए मेरे खाते मे पैसे जमा कर” अशा भूलथापा देवून लाखो रुपये आपल्या खात्यात जमा झाल्यावर त्या आदीवासीला तोंडही न दाखविणे असे जिवघेणे प्रकारही हे लुटारु दलाल करीत आहेत. दुःखाची बाब ही आहे कि, आपल्यावर झालेला हा अन्याय ह्या आदीवासीना धडपणे कुणाला सांगताही येत नाही. कुणाला सांगावंतर तो यांचं काही ऐकूनही घेत नाही. आणि मूळात ह्या आदीवासीना कुणाला काही सांगण्याचं धाडसही होत नाही.

अशा स्थितीत कुणी या आदीवासींचा आवाज बूलंद केला तर हे दलाल त्याला बंदुकीने ऊडविण्याची धमकी देतात. अथवा पोलिसांकरवी त्याला खोट्या गुन्ह्यात गोवले जाते. अशा या भयाण काळोखात हे आदीवासी दिलाशाचा प्रकाशकिरण शोधित आहेत. वास्तविक पैसा प्राप्तीसाठी आदीवासीनी दिलेल्या कारणांची ते योग्य कि अयोग्य याची शहनिशा करणे, त्या कारणांसाठीच ह्या पैशाचा विनियोग होतोय ह्याची खातरजमा करणे, ह्या पैशाच्या मोहापोटी कुणी आदीवासीना नाडणार नाही ह्याची खबरदारी घेणे ह्याबाबत संबःधित आधिका-यानी दक्षता घेणे अनिवार्य आहे. कारण पैसा प्राप्त होईपर्यंत ह्या आदीवासीना कोणताही धोका नसतो. पैसे मिळाल्यावरच ह्या आदीवासींचा खरा छळ प्रारंभ होतो. त्यामूळे आदीवासीना पैसा प्राप्त झाल्यावर त्याच्या कारणांची अमलबजावणी योग्य रीतीने करवून घेतली गेली तर ह्या लुटारु दलालांना पायबंद घातला जावू शकतो. परंतु वरीष्ठ अधिका-यांचे कनिष्ठ कर्मचारीच या दलालाना सामील असल्याने आणि ते वरिष्ठांच्या कानावर यातील कोणताही प्रकार जावू न देण्याची काळजी घेत असल्याने आणि सोबतच अधिका-याना आॕल वेल असल्याची बतावणी करीत असल्याने संबंधित वरिष्ठ अधिकारी ह्या आदीवासींबाबत ऊदासिन बनले आहेत. परंतु ह्या अमानुष प्रकारांची महाव्हाईस माहीती घेत आहे. माहिती पूर्ण होताच महाव्हाईस या आदीवासींच्या मसिहाची भूमिका पार पाडेल ही काळ्या पत्थरावरिल पांढरी रेघ आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here