राहत्या घरातच तरुणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ…अत्याचार करुन खून केल्याचा पोलिसांना संशय…पारनेर तालुक्यातील घटना

फोटो- सौजन्य - गुगल

न्यूज डेस्क- अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात एका तरुणीचा मृतदेह तिच्याच घरात आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. तरुणीवर अत्याचार करुन तिचा खून केल्याचा संशय पोलिसांना आहे. या प्रकरणी पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतलं आहे.

तरुणी घरात एकटीच असताना हा प्रकार घडल्याच समोर आलंय. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरु करण्यात आलाय. तर या प्रकरणी काही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून कसून चौकशी केली जातेय.

या तरुणीचे आईवडील दोघेही रोजंदारीने कामाला जातात. यावेळी मुलगी घरात एकटीच होती. क्लासला गेलेला तिचा भाऊ घरी आला तेव्हा त्याची बहीण घरात झोपलेली होती. ती प्रतिसाद देत नसल्याचं पाहून त्याने बाहेर येऊन आरडाओरड केला. त्यावेळी आजुबाजूचे लोक धावत आले. त्यांनी मुलीला जवळच्या एका खासगी रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचं घोषित केलं.

याप्रकरणी शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह पाठवण्यात आला असून अहवाल आल्यानंतर मृत्यूचं खरं कारण स्पष्ट होणार आहे. मात्र पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here