गाडेगांव येथील लसीकरण मोहिमेत तरुणांचा उत्कृष्ट प्रतिसाद…

तेल्हारा – गोकुळ हिंगणकर

तेल्हारा तालुक्यातील गाडेगांव येथे आरोग्य विभागाच्या वतीने दिनांक २४/०६/ २०२१ रोजी प्राथमिक आरोग्यवर्धिनी केंद्र दानापुर अंतर्गत आरोग्य उपकेंद्र गाडेगांव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये वय 18 ते पुढील वयोगटातील सर्व पात्र लाभार्थ्यांना कोविशिल्ड लसीकरणाचा पहिला डोस देण्यात आला असून गाडेगांव येथे लसीकरणाचा लाभ देऊन covid-19 आजाराबाबत जनजागृती व आरोग्य शिक्षण दिले ग्रामपंचायत गाडेगांव येथील सरपंच व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

लसीकरणात आरोग्य सेविका मुक्ता गवई तसेच आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका व मदतनीस तसेच उपकेंद्राचे आरोग्य व ग्राम पंचायत कर्मचारी नमो भारत भुषण मंडळ कार्यकर्ते उपस्थित होते आरोग्य उपकेंद्र गाडेगांव येथील समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर आरती गावंडे यांनी सर्वांची आरोग्य तपासणी करून मार्गदर्शन केले गावातील वयोगट 18 ते 45 असलेल्या व्यक्तींनी लसीकरण मोहिमेत भरपूर प्रतिसाद दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here