राज्यस्तरीय तेंग सु डो स्पर्धेत मंतशा, कल्याणी, उत्कर्ष ची उत्कृष्ट कामगिरी…

नरखेड – अतुल दंढारे

३० व ३१ ऑक्टोबर 2021 ला मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुल नाशिक येथे राज्यस्तरीय तेंग सु डो स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत महाराष्ट राज्यातील जवळपास 400 ते 500 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत नागपूर जिल्ह्यातील जलालखेडा, देवग्राम, येथील खेळाडू नि सहभाग नोंदवला होता. या स्पर्धे मध्ये कु.मंतशा एजाज शेख हिने 14 वर्ष वयोगटात पुम्से मध्ये सुवर्ण पदक व फाईट मध्ये सुवर्ण पदक प्राप्त केले.

कु.कल्याणी गजानन निमजे हिने 18 वर्ष वयोगटात पुम्से मध्ये सुवर्णपदक व फाईट मध्ये सुवर्णपदक प्राप्त केले.उत्कर्ष नवीन उनरकर याने 11 वर्ष वयोगटात पुम्से मध्ये रजत पदक व फाईट मध्ये सुवर्ण पदक प्राप्त केले.कु.हिमांशी उमेश अभ्यंकर हिने 14 वर्ष वयोगटात पुम्से मध्ये रजत पदक व फाईट मध्ये सुवर्ण पदक प्राप्त केले.अनमोल शंकर भोयर याने 18 वर्ष वयोगटात पुम्से मध्ये कांस्य पदक व फाईट मध्ये सुवर्ण पदक प्राप्त केले.

ज्ञानेश पाटील ने पुम्से मध्ये रजत पदक व फाईट मध्ये रजत पदक प्राप्त केले.सर्व विजयी स्पर्धकांचे मास्टर रॉकी डिसुझा , मास्टर सुभाष मोहिते, नागपूर विभाग प्रमुख मास्टर किरण यादव , मास्टर नरेंद्र बिहार , तुषार डोईफोडे, काजल राऊत मोहित इंगळे यांनी अभिनंदन केले. या विजयी स्पर्धकांनी आपल्या यशाचे श्रेय आई वडील व प्रशिक्षक नरेंद्र बिहार यांना दिले.हे सर्व खेळाडू मास्टर नरेंद्र बिहार यांचे मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here