प्रशासकीय अधिकाऱ्यांनी वन विभागाची कुठलीही परवानगी न काढता केले वनक्षेत्रात खोदकाम..?

महसूल अधिकाऱ्याची वनविभागाकडून कसून चौकशी सुरू :-कोतवालांचे व्हिडिओ बयान रेकॉर्ड

दर्यापूर – किरण होले

दर्यापुर तालुक्यातील बीट कळमगव्हाण येथील भूखंड क्रमांक 447 मध्ये 11 एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता पासून संपूर्ण रात्रभर नांदेड बुद्रुक गावालगत वनक्षेत्रात जेसीबी चे मशीन द्वारे पांदन रस्त्याचे खोदकाम करण्यात आली.

यासंदर्भात 12 एप्रिल रोजी विनापरवाना वनक्षेत्रात मशीन द्वारे रस्त्याचे खोदकाम गेल्या दोन दिवसांपासून सुरू असल्याची गुप्त माहिती वन विभागाच्या अधिकाराला प्राप्त झाली त्या माहितीच्या आधारे दर्यापूर वनविभागाचे वनरक्षक आर बी पवार यांनी घटनास्थळी धाव घेत संबंधित खोदकाम सुरू असलेल्या मशीनला जप्त केले.नांदेड बुद्रुक गावापासून हाकेच्या अंतरावर वनविभागाची सीमा आहे वनविभागाच्या हद्दीमध्ये पांदण रस्त्याच्या नावाखाली हजारो ब्रास मातीचा उपयोग केल्याचे निदर्शनात आले.

संबंधित वनरक्षक यांनी वरिष्ठ अधिकार्‍यांना माहिती कळताच वरिष्ठ अधिकारी डीबी सोळंके हे सुद्धा घटनास्थळी दाखल झाले पांदण रस्त्याच्या नावाखाली चक्क 7 मीटर रुंदी आणि 40 मीटर लांबी नांदेड बुद्रुक गावाला लागूनच वनविभागाच्या हद्दीतील पाणंद रस्ता थेट विभाग हद्दीतील पूर्णा नदीच्या काठापर्यंत रस्ता खान देऊन थेट पांदन रस्ता तयार करण्यात आला.यामध्ये मोठ्या प्रमाणात निंबाचे झाड , बांबू तसेच खोड मुळासहीत नष्ट करण्यात आले.

जेसीबी मशीन आणि असंख्य मजुराच्या बेकायदेशीररित्या वन विभागाच्या परवानगी न घेता रात्रंदिवस सतत दोन दिवस मातीचा वृक्षांचा उपसा करण्यात आला.रस्ता खोदून दोन्ही साईड मध्ये माती टाकण्यात आली आहे विशेष म्हणजे हे मध्यरात्रीच्या काम सुरू असताना यासंदर्भात वनविभागाची कुठलीही परवानगी घेण्यात आलेले नाही परंतु संबंधित काम हे कुठल्यातरी प्रशासकीय अधिकारांच्या सांगण्यानुसार असं करण्यात आले आहे,

परंतु एवढे मोठे काम सुरु असताना सुद्धा प्रशासनाचा प्रशासनाला गुपित ठेवत आहे. मध्यरात्रीच काम करणे तेसुद्धा वनक्षेत्रात वनविभागाची कुठलीही परवानगी न काढता यामध्ये कोट्यावधी रुपयांचा घोटाळा झाल्याचे चर्चा आहे. संबंधित वनक्षेत्रात काम करीत असताना नांदेड बुद्रुक येथील तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या सांगण्यानुसार जेसीपी मशीन चालकाला कामासंदर्भात रस्ता दाखविण्यात आला होता.

जर वनविभागाची कुठलीही परवानगी न काढता महसूल विभागाचे अधिकाऱ्यांनी मशीनला खोदकाम काढण्यासाठी कुणाची परवानगी दिली आहे . हा एक मोठा प्रश्न आता उपस्थित होत आहे. परंतु संबंधित प्रकरणासंदर्भात वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी चांगलीच कंबर कसली असून विना परवाना खोदकाम करण्यात आल्याने आता महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांची व्हिडिओ रेकॉर्डिंग चौकशी करणे सुरू केली आहे.

सोमवार रोजी वन विभाग कार्यालय दर्यापूर येथे नांदेड बुद्रुक येथील कोतवाल भाग्यश्री वानखडे यांना चौकशी करता बोलावण्यात आले होते . व व्हिडिओ रेकॉर्डिंग द्वारे त्यांची चौकशी करण्यात आली आहे . कोतवालांनी चौकशी दरम्यान सांगितले की मला तलाठी यांचा कॉल आला व संबंधित जेसीबी ला रस्ता दाखवण्यास सांगितले. पुढे काय प्रकरण आहे याची कुठलीही माहिती मला नाही.

त्यामुळे आता या प्रकरणात तलाठी मंडल अधिकारी यांचीसुद्धा चौकशी होणार आहे. व संबंधित प्रकरणात जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कायदेशीर रित्या गुन्हा दाखल करण्यात येईल . अशी माहिती वनपाल डी.बी सोळंके त्यांनी दिली आहे. चौकशीदरम्यान वनरक्षक आर . बी पवार सह अन्य वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here