कोगनोळीतील लक्ष्मी नगर येथील पिण्याच्या पाईप लाईनच्या खुदाई कामाचा शुभारंभ…

राहुल मेस्त्री

कोगनोळी तालुका निपाणी येथील प्रभाग क्रमांक एक मध्ये लक्ष्मीनगर म्हणून परिचित असणाऱ्या भागांमध्ये ग्रामपंचायतीच्या एन आर जी या विशेष फंडातून पिण्याच्या पाईपलाईन कामाचा शुभारंभ येथील ज्येष्ठ नागरिक सदाशिव लोखंडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आणि कृष्णा माने यांच्या हस्ते कुदळ मारून खुदळी कामाचा शुभारंभ करण्यात आला.

या भागात यापूर्वी ग्रामपंचायतीकडून पाईपलाईनद्वारे होणारा पाणीपुरवठा व्यवस्थित होत नव्हता व सदर पाईप जीर्ण अवस्थेत होत्या. त्यामुळे या ठिकाणी नवीन पाईप लाईन करणे काळाची गरज होती .हे लक्षात घेऊन येथील ग्रामपंचायत सदस्य विद्या व्हटकर, स्वाती शिंत्रे, सुनील माने ,सुजित माने यांनी ग्रामपंचायतीमध्ये विशेष ठराव घालून याठिकाणी पाईप लाईन करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला.

याप्रसंगी बापू लोखंडे ,प्रकाश पवार ,अरविंद माने ,निलेश मगदूम, रईस मुल्ला, राजू मुल्ला, प्रकाश नवाळे ,ऋषिकेश नवाळे, रोहन पवार, महेश कुंभार, सोन्या कगुडे यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here