धक्कादायक ! चॉकलेटचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग…शिरजगाव कसबा पोलीस स्टेशन अंतर्गत घटना…

अमरावती जिल्हयात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग होत असल्याचं पुन्हा एकदा उघड झालंय.. जिल्ह्यातील शिरजगाव कसबा पोलीस स्टेशन अंतर्गत एका अल्पवयीन मुलीवर नराधमाने अतिप्रसंग केल्याची संतापजनक घटना पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून समोर आली आहे.

पीडितेला चॉकलेटचे आमिष दाखवून विजय जवंजाळ या नराधमाने तिच्यावर अतिप्रसंग केलाय.. १२ वर्षीय मुलीने आपली कशीबशी सुटका करीत सर्व प्रकार आईला सांगितल्याने हा प्रकार समोर आलाय.

या संदर्भात पोलिसांनी आरोपी विजय जवंजाळ यास अटक केली आहे..तर बाल लैंगिक कायद्याअंतर्गत गुन्हे देखील नोंदविलेत. सद्या आरोपीला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.या संदर्भात अधिक तपास शिरजगाव कसबा पोलीस स्टेशनचे पोलीस सहायक निरीक्षक पंकज दाभाडे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here