माजी सैनिक अज्ञात वाहनाच्या धडकेत ठार…

कोल्हापूर – राजेद्र ढाले

गोकुळ शिरगाव (ता.करवीर) येथील माहामार्गालगत सर्व्हिस रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचारी ठार झाला. माजी सैनिक प्रकाश शंकरराव राऊत ( वय 63, जैन मंदिर शेजारी) गोकुळ शिरगाव असे त्यांचे नाव आहे सोमवारी( ता.९) सायंकाळी हा अपघाताची फिर्याद गोकुळ शिरगाव किराणा दुकानदार महेश दत्तात्रेय येमगेकर यांनी गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात दिली. निष्काळजीपणे वाहन चालवून अपघातास कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे अधिक तपास सहायक फौजदार जाधव करीत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here