ईव्हीट्रिक मोटर्सने १०० डीलरशिपचा टप्पा गाठला…

ईव्हीट्रिक मोटर्स हा भारतातील इलेक्ट्रिक टू-व्हीलर उद्योगातील जगातील आघाडीच्या ब्रँडपैकी एक आहे. कंपनी उत्साहाने आणि जोमाने कार्य करीत आहे कारण तिने अवघ्या ६ महिन्यांच्या कालावधीत संपूर्ण भारतात १००+ डीलरशिपचा अविश्वसनीय टप्पा गाठला आहे. या कामगिरीला केवळ प्रशंसाच मिळाली नाही तर यामुळे प्रतिस्पर्ध्यांसाठी एक विश्वसनीय बेंचमार्क सेट केला गेला आहे.

सध्या राजस्थान, पंजाब, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, तेलंगणा, केरळ, पश्चिम बंगाल आणि बिहार या राज्यांमध्ये ईव्हीट्रिक स्कूटर उपलब्ध आहेत. या ब्रँडची टायर २ आणि टायर ३ बाजारपेठांमध्ये आणि अगदी देशाच्या बहुतांश अंतर्गत भागांमध्ये मोठ्या प्रमाणात डीलरशिपची मध्ये वाढ झालेली आहे. यामुळे आग्रा, वाराणसी, अलिगढ, जोधपूर, बिकानेर, सुरत इत्यादी मेट्रो शहरांच्या पलीकडे जावून अंतर्गत असलेल्या शहरांमध्ये देखील उपस्थित आहे.

ईव्हीट्रिक मोटर्सचे संस्थापक आणि एमडी श्री मनोज पाटील म्हणाले, “कोव्हिड-१९ महामारीमुळे जागतिक स्तरावर एकात्मिक ऑटोमोटिव्ह उद्योगाला जबरदस्त झळ पोचली असतांना देखील, आमच्या कर्मचार्‍यांच्या प्रामाणिक प्रयत्नांमुळे आमच्या ब्रँडने हळूहळू भारतातील जवळजवळ प्रत्येक महत्त्वाच्या राज्यात आणि शहरात मजबूत नेटवर्क तयार केले आहे.”

हा ब्रँड आपल्या ग्राहकांच्या विविध गरजा आणि आवश्यकता पूर्ण करणार्‍या आकर्षक डिझाईन्स आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानासह ७ निर्मित वेगवेगळ्या इलेक्ट्रिकल दुचाकी बाजारात उतरवत आहे. ईव्हीट्रिक स्कूटर्सनी त्यांच्या दर्जेदार उत्पादनामुळे ग्राहकांचा विश्वास संपादन केलेला आहे कारण ब्रँडमध्ये इन-हाऊस रोबोटिक वेल्डिंग चेसिस उत्पादन आणि बांधणी आहे आणि १००% मेक इन इंडिया उत्पादन साध्य करण्याच्या मार्गावर आहे. ईव्हीट्रिक राईड हे सध्या कंपनीचे सर्वाधिक विकले जाणारे मॉडेल असून ग्राहकांनी याला पहिली पसंती दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here