स्वच्छते बाबत सर्वांनी दक्षता पाळणे गरजेचे..! – डाॅ.सिध्दार्थकूमार सूर्यवंशी…

अहमदपूर – बालाजी तोरणे

सध्या कोरोना महामारीने सर्व जगात भीतीचे वातावरण तयार झाले असून प्रत्येकांनी याचा मुकाबला करण्यासाठी स्वच्छतेबाबत अधिक जागरूक असणे गरजेचे असून याची सुरूवात स्वतः पासून करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन यूवक नेते डाॅ सिध्दार्थकूमार सूर्यवंशी यांनी केले.

एनजीओ फंड्स यांच्या वतीने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सेवा सप्ताह साजरा केला जात आहे.या निमित्ताने शहरात स्वच्छता करणा-या कामगारांना मास्क वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थाना वरून ते बोलत होते.प्रमुख पाहूणे म्हणून जिल्हा अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते अण्णाराव सूर्यवंशी,राणी गायकवाड यांची उपस्थिती होती.

पूढे बोलताना ते म्हणाले की,महीला कामगारांनी सातत्याने मास्क,सॅनेटायझर चा वापर करावा.आपण समाजासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करत अहात मानवी समाजावर आपले उपकार आहेत असेही ते म्हणाले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालूका अध्यक्ष सूभाष साबळे यांनी केले तर आभार यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संभाजी शेळके,सूनिल तोगरे,शिलाताई शिंदे आदींनी पूढाकार घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here