अकोला शहर पोलिसांची संध्याकाळी एरिया डोमिनान्स पेट्रोलिंग…

अकोला शहरातील नागरिकां मध्ये सुरक्षतेची भावना वाढीस लागावी व संध्याकाळी 7।00 नंतर लावण्यात आलेला करोना प्रतिबंधाची काटेकोरपणे पालन व्हावे म्हणून पोलीस अधीक्षक जी श्रीधर व अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत ह्यांचे निर्देशा प्रमाणे शहर उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम ह्यांनी शहरातील सर्व पोलीस स्टेशन चे

प्रभारी अधिकारी व त्यांचे दुय्यम अधिकारी हे पोलीस अमलदारांसह त्यांचे पोलीस स्टेशन क्षेत्रातील संवेदनशील व मिश्र वस्तीत एरिया डोमिनान्स पेट्रोलिंग सुरू करण्यात आली आहे, अकोला शहर हे अतिसंवेदनशील शहर म्हणून ओळखल्या जाते, छोट्या घटनेचे रूपांतर एखाद्या मोठ्या घटनेत होण्यास वेळ लागत नाही, विशेष करून

संध्याकाळी शहरात वाहनांची व सर्वसामान्य नागरिकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन प्रत्येक चौकात , मिश्र वस्ती मध्ये पोलिसांचे अस्तित्व दिसावे म्हणून संध्याकाळी 5।30 ते 8।30 एरिया डोमिनान्स पेट्रोलिंग सुरू करण्यात आली आहे, ह्या मध्ये शहरातील सर्व प्रभारी अधिकारी आपल्या दुय्यम अधिकारी कर्मचाऱ्यासह सहभागी झाले, पोलीस

स्टेशन सिटी कोतवाली हद्दी मध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम, सिटी कोतवाली चे पोलीस निरीक्षक उत्तम जाधव, शहर वाहतूक पोलीस निरीक्षक गजानन शेळके आपल्या पोलीस अमलदारांसह सहभागी होऊन गांधी चौक, ताजनापेठ, मोहम्मदली रोड, चांदेकर चौक भागात पायी पेट्रोलिंग केली, पोलिसांची वाहने व मोठा लवाजमा पाहून थोड्या वेळा साठी नागरिक अचंबित झाले होते, अशी एरिया डोमिनान्स पेट्रोलिंग दररोज करण्यात येणार आहे।

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here