कोरोनासारख्या महामारीच्या काळातही जीवची बाजू लावून सेवा पुरविणा-या महिला पोलीस अधिका-यांची मोफत आरोग्य तपासणी…

चेंबूर येथील झेन मल्टीस्पेशॅलिटी हॉस्पीटलचा उपक्रम;सुमारे ८० महिला पोलीस अधिका-यांची तपासणी

मुंबई – धीरज घोलप 

जागतिक महिला दिनाच्या औचित्याने चेंबुर येथील झेन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने मुंबईतील महिला पोलीस अधिका-यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये ८० हून अधिक महिला पोलीस अधिका-यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

हृदय, मूत्रपिंड आणि यकृताचे आजार दूर करण्यासाठी रक्त तपासणी करण्यात आली तसेच त्यांच्या फुफ्फुसाच्या कार्याची तपासणी करण्यात आली. हॉस्पीटलमधील स्त्रीरोगतज्ज्ञांनी याठिकाणी स्त्रीरोगाविषयी विविध शंकांचे निरसन केले.

या उपक्रमात मुंबई विभागातील महिला पोलीस अधिकारी यांच्यासह  श्री.संजय दराडे (अतिरिक्त पोलिस आयुक्त, पूर्व विभाग) मुंबई, डीसीपी कृष्णकांत उपाध्याय, चेंबूर विभागातील एसीपी फिरोज बागवान आणि श्री. पीआय शालिनी शर्मा उपस्थित होते.

 संपुर्ण लॉकडाऊन कालावधील जीव धोक्यात घालून पोलीसांनी समाजाचे रक्षण केले. झेन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक आणि गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. रॉय पाटणकर सांगतात पोलिसांमध्ये तणावाचे प्रमाण अधिक आहे.

कामानिमित्त सतत बाहेर राहणे, वेळेची अनियमितता, अपुरी झोप, संतुलित आहाराचा अभाव या सा-यांमुळे तणावाचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून आले.  यामध्ये सहभागी अनेक महिला पोलीसांना आपले कार्य बजावताना कोरोनाचा संसर्गाची लागण झाली होती.

या आजाराशी लढा देत पुर्णपुणे बरे झाल्यानंतरही या महिला अधिकारी लगेगच आपल्या कर्तव्यावर दाखल झाल्या असून सर्वच स्तरांवर त्यांचे कौतुक करण्यात आले.   या महिला पोलिसांनी नागरिक आणि शहराचे संरक्षण करण्याचे कर्तव्य चोखपणे बजावले आहे. सर्वसामान्यांप्रमाणेच पोलिसांनाही शरीराचे योग्य वजन राखणे आणि नियमित व्यायाम करणे देखील तितकेच आवश्यक आहे.

श्री संजय दराडे(अतिरिक्त पोलिस आयुक्त, पूर्व विभाग, मुंबई) बोलताना म्हणाले की, सर्वप्रथम मी प्रत्येक स्त्रीला महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि दररोज हा दिवस साजरा करावा आणि महिलांना आदर आणि सन्मानाची  वागणूक मिळावी असेही दराडे यांनी स्पष्ट केले.

झेन हॉस्पिटलचे डॉ.पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिसांची आरोग्य तपासणी करण्यात आली. पोलिस निरीक्षक संजय पुजारी अतिरिक्त प्रभारी एसीपी म्हणाले मी सर्व महिला कर्मचार्‍यांना स्त्री रोग तज्ञांशी आरोग्य विषयक चर्चा करण्याचे आवाहन करतो.

महिलावर्गामध्ये वेगाने पसरणा-या कर्करोगासारख्या आजारांवर देखील चर्चा करणे आवश्यक आहे. बहुतांश  स्त्रिया त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात आणि यामुळे भविष्यात गुंतागुंत निर्माण होते.

त्यामुळे वेळीच निदान करणे आवश्यक आहे. तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक त्या सर्व चाचण्या करून त्यानुसार उपचार घ्यावेत. या शिबिराद्वारे झेन हॉस्पीटलने पुढाकार घेऊन महिला पोलिसांच्या आरोग्याची दखल घेतल्याबद्दल पोलीसांनी त्यांचे विशेष आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here