चार वेळा कागदपत्रांची पूर्तता करून सुद्धा पहिल्या टप्प्यापासून अनेक शेतकरी वंचितच !

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या शेतकरी प्रतीक्षेतच !


नया अंदुरा : प्रधानमंत्री किसान निधी योजनेची अंमलबजावणी करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.अद्यापही नया अंदुरा, कारंजा रमजानपुर, अंदुरा, हाता, निंबा,या परिसरात योजनेचा पहिला टप्पासुद्धा मिळाला नाही.

शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक योजनेत म्हणून गणल्या गेलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजने अंतर्गत मात्र, शेतकऱ्यांच्या खात्यात तीन टप्प्यात रक्कम वर्ग केली जाणार आहे. काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अद्यापही पहिला टप्पा सुद्धा जमा झालेला नाही.या योजनेची अंमलबजावणी पूर्णतः ठप्प झाली आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा शुभारंभ प्रधानमंत्री हस्ते २४ फेब्रुवारी करण्यात आले होते त्यापैकी पहिल्या टप्प्यात काही शेतकऱ्यांना बँक खात्यात दोन हजार रुपये निधी जमा करण्यात आला.

Also Read: नागपूरात १९ नविन कोरोनाबाधित रुग्णांची भर…मनपाच्या एका कर्मचाऱ्याचाला कोरोनाची लागण…कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५५९ वर..

संध्या पेरणीसाठी बियाणे खते व फवारणी इत्यादी शेतीसाठी उपयुक्त साहीत्य आणने सुरू आहे.आधीच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांकडे पैसे नसल्याने बियाणे व खते कशी आणावी.असा प्रश्न शेतकर्‍यांना पडला आहे.

तेव्हा वरिष्ठ अधिकारी लक्ष देऊन प्रधानमंत्री किसान सन्मान योजना नीधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here