औरंगाबाद येथील विजय नगर चौकात महाराष्ट्र सेनेची शाखा स्थापन…

औरंगाबाद – विजय हिवराळे

गारखेडा परिसरातील विजय नगर चौकात साहित्य रत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुण जयंतीचे औचित्य साधुन महाराष्ट्र सेनेच्या नामफलकाचे उदघाटन पक्षाचे पक्ष प्रमुख राजुभाई साबळे यांच्य हस्ते करण्यात आले अध्यक्षस्थानी जिल्हा प्रमुख जयकिशन कांबळे होते.

या वेळी प्रमुख उपस्थिति राज्य उपाध्यक्ष अँड.अविनाश थिट्टे, चित्रपट आघाडिचे राज्य सचिव दिपक म्हस्के,प्रा.कसबे सर जिल्हा संपर्क प्रमुख सुरेश कांबळे,जिल्हा उपाध्यक्ष राजकुमार अमोलिक,जिल्हा संघटक राजू भिंगारदेव,जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण बनकर,पूर्व शहर अध्यक्ष रवि मोरे,सुनिल वाहुळ,सुमित जाधव आदीची उपस्थिति होती.

ही शाखा कामगार नेते जिल्हा उपप्रमुख नितीन खाडे यांच्या नेतृत्वा खाली स्थापन करण्यात आली. या वेळी शाखा प्रमुख पंकज नागरे उपाध्यक्ष जय साळवे सचिव संघर्ष पगडे कोषाध्यक्ष शुभम दौंडे यांची निवड करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here