शिवनगर पातुर येथे दुर्गा देवी ची स्थापना…

पातुर तालुक्यात कोरोना संपताच युवकांनी विविध धार्मिक कार्याला सुरुवात करून उत्सवामध्ये सहभागी होऊन आपला आनंद द्विगुणीत करीत आहेत याच धर्तीवर यावर्षी सुद्धा शिवनगर पातुर येथे शिवभक्त नवदुर्गा उत्सव मंडळाच्या युवक कार्यकर्त्यांनी दुर्गादेवीची स्थापना केली आहे.

या देवी स्थापनेचे हे चौथे वर्ष असून दोन हजार अठरा रोजी उत्साही युवकांनी या मंडळाचा पुढाकार घेतला होता यामध्ये दुर्गा उत्सव मंडळाचे अध्यक्ष आकाश करवते उपाध्यक्ष अमोल बोचरे, शुभम बोचरे गोलू मेटांगे, संनद गवई ,गणेश डोंगरे, सौरव भगत, दिनेश काळपांडे, दिनेश डाखोरे, अंकुश गिर्हे,विक्रम सोनोणे, कुणाल पांडे,

प्रथमेश काळपांडे, कृष्णा इंगळे, प्रदीप डाखोरे तसेच सामाजिक कार्यकर्ते अमोल सोनोणे, शुभम जटाळे यांच्यासह शिवनगर भागातील युवक-युवती महिला पुरुष या दुर्गा देवी उत्सव करतात पुढाकार घेत असून दरवर्षी या ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित करीत असतात या वर्षी सुद्धा हा उत्सव मोठ्या उत्साहात युवकांच्या पुढाकारातून साजरा होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here