किटस येथे निवडणूक साक्षरता क्लब स्थापित…

राजू कापसे

निवडणूक साक्षरता क्लब हे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना त्यांच्या निवडणूक अधिकारांबद्दल जागरूक करण्यासाठी आणि त्यांना नोंदणीच्या निवडणूक प्रक्रियेची ओळख करून देण्यासाठी, मनोरंजक उपक्रम आणि प्रत्यक्ष अनुभवांद्वारे सहभागी करून घेण्याचे व्यासपीठ आहे.

याद्वारे, तरुण आणि भावी मतदारांमध्ये निवडणूक सहभागाची संस्कृती मजबूत करणे हे भारतीय निवडणूक आयोगाचे उद्दिष्ट आहे. या ब्रीदवाक्यासह, कविकुलगुरू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स, रामटेक यांनी 18 नोव्हेंबर 2021 रोजी नायब तहसीलदार सारिका धात्रक यांच्या हस्ते क्लबचे उद्घाटन झाले.

सारिका धात्रक यांनी मतदार नोंदणी फॉर्म भरण्यासाठी आवश्यक असलेली सर्व प्रक्रिया आणि कागदपत्रांची यादी सांगितली. प्राचार्य डॉ. अविनाश श्रीखंडे यानी
जास्तीत जास्त विद्यार्थानी नविन मतदार नोंदनीसाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले.

या वेळी प्रामुख्याने विद्यार्थी डीन डॉ. पंकज आष्टनकर, सहयोगी डीन भूषण देशपांडे, विभागप्रमुख डॉ. शरद पोकळे, डॉ. यशवंत जिभकाटे, सरोज शंभरकर, चंद्रशेखर सावरकर उपस्थित होते. डॉ. पंकज आष्टणकर यांनी मान्यवरांचे व उपस्थितांचे आभार मानले. यात विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here