पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी आदिवासी नृत्यावर धरला ठेका…पाहा व्हिडीओ

न्यूज डेस्क – आज जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी आदिवासी बांधावासोबत नृत्यांचा आनंद लुटला. यावेळी मुंबईत आरे कॉलनीतील गेले असता आदिवासी दिनानिमित्य कार्यक्रमाला हजेरी लावली. आदित्य ठाकरे नागरिकांसोबत नृत्य करत असल्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आदित्य ठाकरे यांनी आदिवासी बांधव-भगिनींना ट्वटिद्वारे शुभेच्छा देखील दिल्या आहेत.

पंचतत्त्वांशी जवळचे नाते असणाऱ्या माझ्या आदिवासी बांधव-भगिनींना जागतिक आदिवासी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज आरे कॉलनी येथील पाड्यामधील नागरिकांसह हा दिवस साजरा करण्याची संधी मला मिळाली, याचा आनंद आहे. येथील रहिवाशांकडून मिळणारे प्रेम भारावून टाकणारे आहे. असं आदित्य ठाकरे यांनी ट्विट केलं आहे.

जागतिक आदिवासी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास हजेरी लावल्यानंतर, आदित्य ठाकरे यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पुजन केले. याप्रसंगी नागरिकांची मोठ्यासंख्येने गर्दी झाल्याचे दिसून आले. यावेळी त्यांच्यासोबत काही शिवसेना पदाधिकाऱ्यांची देखील उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here